Download App

गौतम अदानी रात्रीच फडणवीसांच्या भेटीला, दोघांत चर्चा; भेटीचं कारण मात्र गुलदस्त्यात

प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली आहे.

Gautam Adani-Devendra Fadnavis Meet : राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट झाली आहे. गौतम अदानी यांनी (Gautam Adani) फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जाऊन भेट घेतली. दोघांत बराच वेळ चर्चा झाली. मात्र ही चर्चा काय होती, गौतम अदानी यांनी अचानक देवेंद्र फडणवीस यांची भेट का घेतली याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

सध्या देशाच्या राजकारणात गौतम अदानी चर्चेत आहेत. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी अदानींचे नाव घेत केंद्रातील भाजप सरकारची कोंडी करू पाहत आहेत. यातच अमेरिकेतील हिंडनबर्ग संस्थेचे काही अहवाल आल्यानंतर अदानी ग्रुपमध्ये अस्वस्थता वाढली होती. राज्य सरकारने मुंबईतील धारावी झोपडपट्टीच्या पुनर्विकासाचे काम अदानींनाच दिले आहे.

गौतम अदानींना पुन्हा धक्का, चक्क 3800 कोटी रुपयांच्या प्रकल्पातून कंपनीची माघार, ‘हे’ आहे कारण

अशा परिस्थितीत गौतम अदानी काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी सागर बंगल्यावर पोहोचले होते. त्यांच्या या अचानक भेटीने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत. याआधी गौतम अदानी यांनी शरद पवारांचीही भेट घेतली होती. यानंतर बऱ्याच दिवसांनी अदानी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल झाले.

उभयतांत तब्बल दोन तास चर्चा झाली. यानंतर रात्री 12.10 वाजता गौतम अदानी सागर बंगल्यातून बाहेर पडले. गौतम अदानी यांचे मुंबईतील धारावी पुनर्विकास प्रकल्पासह चार प्रकल्प निर्माणाधीन आहेत. गोरेगाव मोतीलाल नगर येथील प्रकल्पही अदानींनाच मिळाला आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे काम अदानी ग्रुपने सुरू केले आहे. सध्या या बांधकामाचे सर्वेक्षण सुरू आहे. यानंतर रहिवाशांची पात्रता निश्चित केली जाणार आहे.

या प्रकल्पासाठी राज्य सरकार आणि अदानी समुहाच्या संयु्क्त भागीदारीत धारावी रिडेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेड नावाने कंपनीची स्थापना करण्यात आली. यामध्ये अदानींचे 80 टक्क तर राज्य सरकारची 20 टक्के भागीदारी राहणार आहे. गोरेगाव येथील मोतीलाल नगर येथील प्रकल्पही अदानी समुहाला मिळाला आहे. या प्रकल्पासाठी अदानी समुहाने 36 हजार कोटी रुपयांची सर्वाधिक बोली लावली होती.

Video : पंतप्रधान नरेंद्र मोदींना अमेरिका दौऱ्यात ट्रम्प यांच्यासमोरच अदानींवर प्रश्न, काय दिलं उत्तर?

follow us