Download App

Bhima Koregaon case : नजरकैदेत असलेल्या गौतम नवलखा यांची दिल्ली पोलिसांकडून पुन्हा चौकशी

  • Written By: Last Updated:

Gautam Navlakha : एल्गार परिषद आणि भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी आणि माओाद्यांशी संबंध असल्याच्या कारणाने नजरकैदेत असलेले गौतम नवलखा (Gautam Navlakha) यांना काही दिवसांपूर्वीच उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. मात्र, राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या स्थगितीच्या मागणीनंतर उच्च न्यायालयाने या निर्णयाला तीन आठवड्यांची स्थिगिती दिली. दरम्यान, अशातच आज (शनिवार) पुन्हा एकदा दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) काही प्रकरणांमध्ये त्यांची झाडाझडती घेतली आहे. त्यामुळं त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, ही नेमकी कशाची चौकशी केली गेली याबाबत याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली.

‘जालना ते मुंबई’ वंदे भारत एक्सप्रेसचा रुट आणि टायमिंग कसा? महत्त्वाची माहिती आली समोर… 

1 जानेवारी 2018 रोजी पुण्यातील भीमा-कोरेगाव येथे हिंसाचार झाला. ईस्ट इंडिया कंपनी आणि मराठे यांच्यात झालेल्या लढाईच्या स्मृतिपित्यर्थ द्विशताब्दी समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी मोठ्या संख्येने लोक जमले होते. मात्र या ठिकाणी अचानक दंगल उसळली. त्या प्रकरणाची अद्याप चौकशी सुरू आहे. या प्रकरणी अनेकांना अटक झाली होती. पत्रकार गौतम नवलखा यांनाही या प्रकरणात अटक करण्यात आली होती. या घटनेनंतर त्यांच्यावर झालेले आरोप त्यांनी फेटाळून लावले होते. पण 2020 मध्ये त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा समितीसमोर शरणागती पत्करली होती. तेव्हापासून ते न्यायालयाच्या आदेशानुसार नवी मुंबई सीबीडी येथे नजरकैदेत आहेत. मात्र आज अचानक दिल्ली पोलिस या ठिकाणी धडकले आणि त्यांनी नवलखा यांची चौकशी सुरू केली.

नवलखा यांची दिल्ली पोलिसांनी आज दिवसभर अनेक बाबतीत चौकशी केली, मात्र या चौकशीची तपशील समजू शकला नाही. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,न्यूज क्लिकच्या कथित परेशी फडं, देशविरोधी कारवाया, अतिरेकी संघटना संबंधित लोकांशी असलेले संबंध याबाबत चौकशी करण्यात आल्याचं बोलल्या जात आहे.

UAPA अंतर्गत अटकेत
भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील आरोपी गौतम नवलखा यांना UAPA कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली आहे. त्यांना अटक होऊन तीन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. ते शहरी नक्षलवाद चळवळीत महत्वाची भूमिका बजावत होते असा आरोप त्यांच्यावर होता. याशिवाय, असा आरोप आहे की नवलखा हे 1991 पासून पुरकायस्थशी संबंधित आहेत आणि 2018 पासून PPK Newsclick Studio Private Limited चे शेअरहोल्डर आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत निवडणूक प्रक्रियेत व्यत्यय आणण्यासाठी पुरकायस्थ यांनी पीपल्स अलायन्स फॉर डेमोक्रसी अँड सेक्युलॅरिझम (PADS) या गटासोबत कट रचल्याचा आरोप आहे.

follow us