‘जालना ते मुंबई’ वंदे भारत एक्सप्रेसचा रुट आणि टायमिंग कसा? महत्त्वाची माहिती आली समोर…
Jalna to Mumbai Vande Bharat : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज नवीन जालना-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला (Jalna to Mumbai Vande Bharat) ऑनलाईन हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर ही ट्रेन मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे आपल्या पहिल्या फेरीसाठी रवाना झाली. आता महाराष्ट्रात जालना ते मुंबई, मुंबई ते सोलापूर, मुंबई ते शिर्डी, मुंबई ते मडगाव, मुंबई सेन्ट्रल ते गांधीनगर, नागपूर ते इंदोर आणि नागपूर ते बिलासपुर अशा सात ट्रेन्स धावतील.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मान्यवर जालन्यात उपस्थित होते. फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रातील ही सहावी वंदे भारत एक्सप्रेस सेवा असून तिचे रेक लवकरच लातूरमध्ये तयार केले जातील. दानवे-पाटील म्हणाले की, ट्रेन प्रवाशांना आधुनिक, सुरक्षित आणि आरामदायी प्रवास देईल आणि तिच्या 8 डब्यांमध्ये 530 प्रवासी बसू शकतील.
आता भारतातील वंदे भारत रेल्वेची एकूण संख्या 34 वर पोहोचली असून मनमाड ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान रेल्वे मार्ग दुहेरीकरणासाठी सुमारे 1,000 कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.
Sharad Pawar : मी 72 हजार कोटींचे कर्ज माफ केले, पण आज शेतकऱ्यांकडे ढुंकूनही बघितले जात नाही…
मराठवाड्यातील पहिली एक्सप्रेस ट्रेन
मार्चपर्यंत हे काम सुरू होणार असून पुढील मार्गाचे सर्वेक्षण सुरू झाले असून त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आल्याचे दानवे-पाटील यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर मान्यावर नव्या ट्रेनने मुंबईकडे रवाना झाले. जालना-मुंबई (CSMT) वंदे भारत एक्स्प्रेस ही मराठवाडा विभागाला सेवा देणारी पहिली एक्स्प्रेस असून जालना, छत्रपती संभाजीनगर, मनमाड, नाशिक या महत्त्वाच्या शहरांना मुंबईशी जोडणार आहे.
अशी आहे वंदे भारत
मुंबई-जालना रेल्वे अंतर वंदे भारत 5 तास 20 मिनिटांत पार करणार असून ही ट्रेन दररोज सकाळी जालना रेल्वे स्थानकातून 5.05 मिनिटांनी सुटणार आहे. पूर्णपणे वातानुकूलित ट्रेनमध्ये स्वयंचलित सरकते दरवाजे, सर्व डब्ब्यामध्ये आरामदायी सीट, चेअर कारमधील अर्गोनॉमिक रिक्लिनर्स आणि एक्जीक्यूटिव क्लासमध्ये 360-डिग्री फिरणाऱ्या सीट यासारखी अत्याधुनिक वैशिष्ट्ये आहेत.
चुम्मा-चुम्मा पुरस्काराचे मानकरी कोण हे…;रोहिणी खडसेंकडून शीतल म्हात्रेंचा खास शैलीत समाचार !
सीसीटीव्हीचे लक्ष्य
GPS-सक्षम प्रवासी सूचना वैशिष्ट्य प्रवासादरम्यान लाईव्ह ट्रेनची माहिती देते. प्रत्येक कोचमध्ये मोबाइल चार्जिंग सॉकेट, हॉटकेस, बाटली कूलर, डीप फ्रीझर, अपंगांसाठी सुलभ, फायर डिटेक्शनसह प्रत्येक कोचमध्ये सप्रेशन सिस्टीम, सीसीटीव्ही कॅमेरे यांची सुविधा आहे. आपत्कालीन परिस्थितीत सुलभ बॉक्स कव्हर, प्रत्येक कोचमध्ये उघडण्यायोग्य खिडक्या, अग्निशामक उपकरणे, अलार्म बटणे, टॉकबॅक युनिट्स आणि आधुनिक बायो-व्हॅक्यूम टॉयलेट देखील आहेत.