मृत्यूनंतर पाप-पुण्याचा हिशोब होणार, मोदी नरकात जाणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद भडकले

Shankaracharya Avimukteshwarananda भाजपविरूद्ध वक्तव्यांसाठी चर्चेत येतात. त्यात त्यांनी थेट पंतप्रधान मोदी नरकात जाणार असल्याचं म्हटलं आहे.

Shankaracharya Avimukteshwarananda

Modi will go to hell; Shankaracharya Avimukteshwarananda gets angry : जोशीमठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वारानंद हे नेहमीच त्याच्या भाजप सरकारच्या विरूद्ध वक्तव्यांसाठी चर्चेत येत असतात. त्यात आता त्यांनी थेट पंतप्रधान मोदी नरकात जाणार असल्याचं म्हटलं आहे. ते नेमकं काय म्हणाले? आणि असं का म्हणाले जाणून घेऊ…

शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद नेमकं काय म्हणाले?

या जगामध्ये पंतप्रधान मोदींचा सर्वात मोठा हितचिंतक मी आहे. कारण मी त्यांचं या लोकांतील भविष्यच नाही तर परलोकातील भविष्य देखील पाहिलं आहे. कारण हिंदू धर्मामध्ये मृत्यूनंतर यमराजांकेड पाप-पुण्यांचा हिशोब केला जातो असं मानलं जातं. पण मोदी जेव्हा यमराजा समोर जातील तेव्हा त्यांना गौ हत्येला दिलेल्या सहमतीसाठीचं फळ भोगावं लागेल. ते कोट्यवधि वर्षांसाठी नरकात जातील.

अभिनय सोडून राजकारणात आलेला मोदींचा सहकारी मंत्री वैतागला; म्हणाला, माझं उत्पन्न बंद झालं

त्यामुळे जे लोक स्वत: ला हिंदू समजतात त्यांच्या परलोकाची मला चिंता आहे. अविमुक्तेश्वरानंदांनी हे वक्तव्य बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये गौ रक्षक उतरणार आहे. त्यावर बोलताना केले आहे. तसेच त्यांच्या प्रचारासाठी मी देखील मैदानात उतरेल असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

…तर तुम्हाला टक्क्यातही ठेवणार नाही; हैदराबाद गॅझेटवरून धनंजय मुंडेंचा जरांगेंना इशारा

तसेच ते पुढे म्हणाले की, आम्ही गौ रक्षेसाठी अनेक पक्षांवर विश्वास ठेवला. पण सर्वांनी विश्वास घात केला. जर आम्ही त्यांना तरी देखील मतदान देत असू तर ते आम्हाला देखईल गौ हत्येचे भागीादार बनवतील. मी नितीश कुमार यांच्यासह सर्व मंत्र्‍यांशी यावर चर्चा केली. मात्र ते पलटले. कुणीही साथ दिली नाही. असं म्हणत अविमुक्तेश्वारानंद यांनी मोदी, भाजप आणि एनडीएवर टीका केली.

follow us