Download App

ठाण्यातील महाविद्यालयात NCC ट्रेनिंगच्या नावाखाली विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, व्हिडिओ व्हायरल

  • Written By: Last Updated:

ठाणे : ठाण्यातील बांदोडकर आणि जोशी बेडेकर महाविद्यालयात (Bandodkar and Joshi Bedekar College) एनसीसीच्या (NCC) द्यार्थ्यांना बेदम मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. तालिबांनी पध्दतीने शिक्षा देण्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांमध्ये खळबळ उडाली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी पावसाच्या पाण्यात जमिनीवर डोके ठेवून उभे असल्याचे दिसत आहे. तर एक विद्यार्थी त्यांना काठीने अमानुष मारहाण करत आहे. (In Bandodkar and Joshi Bedekar college brutal punishment by senior student to junior students in the name of NCC training)

जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या प्रांगणात बांदोडकर, बेडेकर आणि पॉलिटेक्निक या तिन्ही विभागातील विद्यार्थ्यांना संयुक्तपणे एनसीसीचे प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना लष्कर आणि नौदलाचे पूर्व-प्रशिक्षणाचे धडे देण्यात देतात. यावेळी विद्यार्थ्यांकडून काही चूक झाली तर त्यांना शिक्षाही केली जाते. मात्र विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या अमानुष शिक्षेने खळबळ उडाली आहे. या व्हारयल झालेल्या व्हिडिओत विद्यार्थ्य्यांना कॉलेजच्या कॅम्पसमध्ये साचलेल्या पाण्यात डोके टाकून पायावर उभे करण्यात आल्याचं दिसून येत आहे. तर सिनिअर विद्यार्थी हातात लाकडाची काठी घेऊन त्यांनी काठीने मारहाण करतो.

मेटाकडून नवीन AI टूल लॉंच, लिहिलेल्या मजकूराचं आवाजात रुपांतर होणार 

या अमानुष शिक्षेमुळं एनसीसीबाबत विद्यार्थ्यांमध्ये घबराट पसरली असून अनेक विद्यार्थी एनसीसीमध्ये सहभागी होण्यास घाबरत आहेत.

प्राचार्यांची काय म्हणाल्या?
हे प्रकरण समोर आल्यानंतर जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या प्राचार्या सुचित्रा नाईक यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. सुचित्रा नाईक म्हणाल्या, “विद्यार्थ्यांना अजिबात काळजी करण्याची गरज नाही, असे प्रकार आम्ही खपवून घेणार नाही, एनसीसी प्रशिक्षक हे सिनियर विद्यार्थीच असतात. ते शिक्षक नसतात. मात्र हा प्रकार अत्यंत घृणास्पद आहे. प्रशिक्षणादरम्यान शिक्षक घटनास्थळी उपस्थित नसताना ही घटना घडली. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांवर तातडीने कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आम्ही एक समिती स्थापन करत आहोत. कोणत्याही विद्यार्थ्यासोबत असे प्रकार घडल्यास त्यांनी अजिबात घाबरू नये. आम्हाला येऊन भेटावं, एनसीसी सोडण्याचा अजिबात विचार करू नये, असंही प्राचार्या नाईक यांनी सांगितले.

Tags

follow us