मोठी बातमी! भाजपकडून पाकीट आलं अन् शिंदे सेनेने फोडलं, पोलिसांचं पथक हजर

प्रचारादरम्यान पांढऱ्या पाकिटात 3000 रुपये म्हणजे 500 रुपयांच्या 6 नोटा टाकून हे पैसे वाटप केले जात असल्याचे निदर्शनास आले.

News Photo   2026 01 11T173426.722

मोठी बातमी! भाजपकडून पाकीट आलं अन् शिंदे सेनेने फोडलं, पोलिसांचं पथक हजर

महापालिका निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. (BMC) बूथवरही कार्यकर्ते आणि पदाधिकारी काम करत असल्याचं दिसून येत आहे. मतदारांच्या याद्या बनवून त्या मतदारांपर्यंत पोहचवणं सुरू आहे. मात्र, काही ठिकाणी मतदारांना आमिष दाखवण्याचं, पैसे देण्याचे प्रकारही उघडकीस येत आहेत. भाजपने सर्वाधिक जागा बिनविरोध केलेल्या कल्याण डोंबिवली महापालिकेतील एका उमेदवाराच्या प्रचारार्थ चक्क पैशांचे वाटप केल्याचं उघडकीस आलं आहे.

या पैशाच्या वाटपाबद्दल डोंबिवलीतील एका महिलेच्या घरी पैशांची पाकिटे आढळल्यानंतर समोर आलं आहे. निवडणूक प्रचारादरम्यान पांढऱ्या पाकिटात 3000 रुपये म्हणजे 500 रुपयांच्या 6 नोटा टाकून हे पैसे वाटप केले जात असल्याचे निदर्शनास आले. डोंबिवलीच्या तुकाराम नगर परिसरातील दशरथ भुवन परिसरात भाजपकडून तीन हजार रुपयांची पाकीटे नागरिकांच्या घरी पोहोचवण्यात येत आहेत. येथील शिवसेनेचे उमेदवार नितीन पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटणाऱ्याना रंगेहाथ हात पकडल्याने हे उघडकीस आलं आहे.

मोठी बातमी! अजितदादांच्या नेतृत्वात सर्व प्लॅन तयार; काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

या घटनेनंतर निवडणूक आयोगाचे पथक व पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहेत. मात्र, भाजपने सर्वाधिक जागा बिनविरोध केलेल्या महापालिकेतही भाजप उमेदवाराकडून पैशांचं अशाप्रकारे होत असलेलं वाटप चर्चेत आहे. दरम्यान, येथील प्रभागात भाजप आणि शिवसेना यांच्यात मैत्रिपूर्ण लढत होत आहे. त्यामुळे, भाजप उमेदवाराविरुद्ध शिवसेना उमेदवार येथे निवडणुकीच्या मैदानात आहे.

त्यामुळे, येथे महायुतीतील दोन पक्षांतच थेट लढत होत असल्याने मोठी रस्सीखेंच पाहायला मिळते. विशू पेडणेकर यांचे कार्यकर्ते असल्याचं समोर आलं आहे, विशेष म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते व्हिडिओ बनवून हा पैसे वाटपाचा डाव उधळत असल्याचंही दिसून येतं. त्यामुळे, महायुती म्हणून एकत्र लढणाऱ्या भाजप आणि शिवसेनेतच येथे जुंपल्याचं स्पष्ट होत आहे.

Exit mobile version