Download App

फडणवीसांकडून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न; इक्बालसिंह चहल यांना गृह विभागात दिली मोठी जबाबदारी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे अतिरिक्त सचिव इक्बालसिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांची तडकाफडकी बदली करण्यात आली.

  • Written By: Last Updated:

Iqbal Singh Chahal : मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे अतिरिक्त सचिव इक्बालसिंह चह (Iqbal Singh Chahal) यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इक्बालसिंह चहल यांच्याकडे आता गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे.

लैंगिक शोषण अन् अभिनेत्रींना कोड नेम; मल्लाळम् फिल्म इंडट्रीमधील ‘डर्टी पिक्चर’ अहवालातून जगासमोर 

इक्बालसिंह चहल हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात. चहल आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदाचा कार्यभार सांभाळणार आहेत. बदलापूरच्या घटनेनंतर राज्यात संतापाची लाट उसळल्याने राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला. विरोधकांनीही सरकारला घेरले आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर चहल यांची घाईघाईने बदली करण्यात आल्याचे बोललं जात आहे.

Aho Vikramarka : चाहत्यांनी ‘अहो विक्रमार्का’साठी बनवले 75 फूटी पोस्टर 

दरम्यान, निवडणूक आयोगाच्या नियमानुसार तीन वर्षांहून अधिक काळ एकाच पदावर, जिल्ह्यात अथवा मूळ गाव असलेल्या जिल्ह्यात कार्यरत असलेल्या निवडणुकीच्या कामाशी संबंधित अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश आयोगाने दिले होते. याच आदेशानुसार, इक्बालसिंह चहल यांची बदली करण्यात आली होती. आता इक्बालसिंह चहल यांच्याकडे गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिवपदाची आणि खनिकर्म विभागाचा अतिरिक्त कार्यभार सोपण्यात आला.

कोण आहे इक्बालसिंह चहल?

इक्बालसिंह चहल हे १९८९ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. सध्या ते एकनाथ शिंदे यांचे अतिरिक्त सचिव म्हणून काम पाहत आहे. तर यापूर्वी त्यांनी जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव म्हणून काम पाहिले. इक्बाल सिंग चहल यांना भारतीय प्रशासकीय सेवेतील 30 वर्षांचा अनुभव आहे. नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, औरंगाबाद विभागाचे अतिरिक्त आयुक्त, औरंगाबादचे जिल्हा दंडाधिकारी, ठाण्याचे जिल्हाधिकारी, पर्यावरण विभागाचे सहसचिव आदी पदावंर त्यांनी काम केलं.

follow us