Download App

आव्हाडांनी सांगितला शरद पवारांसमोरचं राष्ट्रवादीचा व्हीप, दादा समर्थकांनी घातला गोंधळ

प्रफुल्ल साळुंखे-विशेष प्रतिनिधी

Ajit Pawar vs Jayant Patil : शिवसेनेत पडलेली फूट, शिवसेनेबाबत निवडणूक आयोगाचा निकाल, शिवसेनाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हे सर्वांना माहिती आहे. पण नक्की हा निकाल कुणाच्या बाजूने लागला याविषयी अनेकांमध्ये मतमतांतरे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड हे सध्या शिवसेनाच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय लोकांना समजावून सांगत आहेत. अशा एका कर्यक्रमात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल समजून सांगताना जयंत पाटील आणि अजितदादांचे समर्थक शरद पवार यांच्यासमोरच भिडले.

जितेंद्र आव्हाड हे ‘निर्णय समजून घेऊया’ अशा आशयाचा कार्यक्रम करत आहेत. ठाण्यात या कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी हा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण सभगृहात ठेवला. या कार्यकमांला पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते.

यावेळी आव्हाड यांनी या कार्यक्रमात न्यायालयाच्या निकालाचे विश्लेषण केले. यात पक्षाचा प्रमुख, गटनेता यांना किती महत्व असते हे समजावून सांगितलं. ज्यावेळी शिवसेनेत फूट पाडली त्यावेळी गटनेता आणि पक्ष प्रमुख दोन्ही पद हे उद्धव ठाकरे यांच्याकडे होते. त्यामुळे खरी सेना कोणाची हे स्पष्ट करुन सांगितलं. कार्यक्रमाच्या शेवटी जितेंद्र आव्हाड यांनी काही उदाहरण दिली. यात समजा आपल्या महारष्ट्रामध्ये जर अशी घटना झाली तर कोणाचा व्हिप चालेल? असा प्रश्न केला. लागेचच त्यांनी उत्तरही दिले. अशा वेळी जयंत पाटील यांचाच व्हीप चालेल हे बोलून गेले.

“अशा ‘कले’ला नको रे बाबा संरक्षण”, संभाजीराजेंनी भूमिका बदलली…

जितेंद्र आव्हाड यांनी विधान करताच सर्व जण आवक झाले. या कार्यक्रमात अजितदादा समर्थक काही लोकांनी घोषणा देण्याचा प्रयत्न केला. पण वरिष्ठांना हे समजताच सर्वांनी शांत बसण्याचे इशारे केले. गेल्या काही दिवसांत अजित पवारांची राष्ट्रवादीत कोंडी होते, अजित पवार पक्ष सोडणार, अजित पवार विरुद्ध जयंत पाटील अशा संघर्षाच्या अनेक बातम्या समोर आल्या होत्या. पण या सर्वांवर अजित पवार यांनी पडदा टाकला होता.

अमरावती लोकसभा मतदारसंघ कॉंग्रेसलाच सुटला पाहिजे; यशोमती ठाकूर आग्रही

आज जितेंद्र आव्हाड यांनी व्हीप कुणाचा चालेल हे विनाकारण बोलून हा वाद पुन्हा चव्हाट्यावर का आणला असाच प्रश्न कार्यक्रम संपल्यानंतर अनेकांनी उपस्थित केला. शरद पवार आणि जयंत पाटील समोर असताना जितेंद्र आव्हाड यांचे विधान हे ठरवून होते? की ते अनावधाने बोलले याविषयी देखील चांगलीच चर्चा रंगली होती.

Tags

follow us