Download App

जितेंद्र आव्हाडांनी थेट छगन भुजबळांची का घेतली बाजू?

Jitendra Awhad On Sanjay Gaikwad : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation)अध्यादेशानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी विरोध केला. त्यावरुन शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad)यांनी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली. त्यांच्या कमरेत लाथ घालून बाहेर काढा, असं वक्तव्य संजय गायकवाड यांनी केलं. त्या वक्तव्याविरोधात आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे (NCP Sharad Pawar group)आमदार जितेंद्र आव्हाड हे मंत्री छगन भुजबळ यांच्या बाजूने उभे राहिले आहेत. आव्हाड यांनी संजय गायकवाड यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.

कोस्टल रोडची आयडिया ठाकरेंची! मोदींच्या हस्ते होणाऱ्या उद्घाटनापूर्वी आदित्य ठाकरेंनी थोपटले दंड

सरकारच्या प्रतिनिधींनी 75 वर्षांच्या भुजबळांना एकटं पाडलं इतर मंत्र्यांनी विरोध का केला नाही? असाही सवाल यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले की, मंत्री छगन भुजबळ यांच्याशी आमचे वैचारिक मतभेद झाले. भुजबळ हे शरद पवार यांच्याबद्दल ज्या पद्धतीनं बोलले ते आम्हाला आजही योग्य वाटत नाही.

Giorgia Andriani: अरबाज खानची एक्स गर्लफ्रेंडचा भाईजानबद्दल मोठा खुलासा; म्हणाली…

दुसरीकडं मंत्री छगन भुजबळ यांच्याबद्दल ते ज्या मंत्रिमंडळात आहेत, त्या मंत्रिमंडळातील एका पक्षाचा आमदार ज्या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी छगन भुजबळांबद्दल असं म्हणणं याचा आम्ही निषेध करतो. हे असं म्हणणं असंवैधानिक आहे. ते या मंत्रिमंडळातील सहकारी आहेत.

खरंतर त्यांनीपण हे मंत्रिमंडळातच बोललं पाहिजे. पण मंत्रिमंडळात ओबीसींची बाजू मांडायला कमी पडत आहेत, हे दिसतंय. त्यांनी निर्णय घ्यावा आम्ही सगळेजण त्यांच्या बरोबर आहोत, असं म्हणत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मंत्री छगन भुजबळांना पाठिंबा जाहीर केला आहे.

आमचं मत स्पष्ट आहे की, मराठ्यांना आरक्षण द्यावं, पण ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता. आम्हाला वाद घालायचे नाहीत. आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलं आहे की, आपण हजारो वर्ष एकत्र राहिलो आहोत.

आपण सर्व बहुजन आहोत. बहुजनांमध्ये भांडणं लागावीत ही बहुजनांची इच्छा आहे. कारण बहुजन एक झाले तर सत्ता दुसरीकडं जाऊच शकत नाही. त्यामुळे बहुजनांना एका बाजूला काढा आणि मराठ्यांना एका बाजूला काढा अन् झुंजवत ठेवा. मिळतंय काय कोणाला ठेंगा.

मराठा आरक्षणाच्या त्या सर्क्युलरमध्ये आहे की, सगेसोयऱ्यांना देखील कुनबीचे प्रमाणपत्र द्या, त्याच्यावर आव्हाड म्हणाले की, आता माझी बायको ब्राम्हण आहे. तर मग तिच्या बहिणीला तुम्ही वंजारी म्हणून प्रमाणपत्र देणार का? ते तर सगेसोयरे झाले ना… माझ्या बायकोच्या मुलांना प्रमाणपत्र देणार का? असा सवालही यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला.

त्याचबरोबर मागासवर्गीय महिलेने सवर्णासोबत लग्न केले तर आईची जात लावण्यात यावी. आणि मराठा समाजाला सगेसोयरेप्रमाणे आरक्षण दिल्यास आमच्यासारख्या वंजारी समाजाला देखील सगेसोयरेप्रमाणे इतर जातीतील महिलांना देखील आरक्षण द्यावं अशीही मागणी यावेळी आव्हाडांनी केली आहे.

follow us

वेब स्टोरीज