Jitendra Awhad : मनगट आमच्याकडेच फक्त घड्याळाची चोरी झाली असल्याचा घणाघात शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी अजित पवार गटावर केला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी कोणाची यावर निवडणूक आयोगाने निकाल दिल्यानंतर शरद पवार गटाकडून अजित पवार गटावर जोरदार टीका केली जात आहे. अशातच आता जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर करीत अजित पवार गटावर निशाणा साधला आहे.
अखेर सत्य सामोरे आलेच ! निवडणूक आयोगानेही नाव देतानाही कळत- न कळत हे दाखवून दिले की, एनसीपी ही शरद पवार साहेबांचीच आहे. म्हणून आम्हाला नाव मिळालं, "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरद पवार" . हेच खरे जन्मदाते होते पक्षाचे. पण, काही पाकिटमारांनी घड्याळ चोरले. पण, त्यांच्या दुर्देवाने…
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 7, 2024
जितेंद्र आव्हाड पोस्टमध्ये म्हणाले, “अखेर सत्य सामोरे आलेच ! निवडणूक आयोगानेही नाव देतानाही कळत- न कळत हे दाखवून दिले की, एनसीपी ही शरद पवार साहेबांचीच आहे. म्हणून आम्हाला नाव मिळालं, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरद पवार” . हेच खरे जन्मदाते होते पक्षाचे. पण, काही पाकिटमारांनी घड्याळ चोरले. पण, त्यांच्या दुर्देवाने मनगट आमच्याकडेच राहिले. लढाईत नेहमी मनगटच कामी येत असतं. शरद पवार आमचे मनगट अन् त्यात असलेला जोर पुन्हा एकदा महाराष्ट्रात जादू करेल. आता त्यांनी नाव घ्यावे, “एनसीपी – अलिबाबा आणि चाळीस चोर” अशी सडकून टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
Pratap Dhakane : अजितदादा स्वार्थी पण पवारांचं काही अडत नाही, म्हणत ढाकणेंचे कार्यकर्त्यांना आवाहन
राष्ट्रवादी पक्ष चिन्ह गेल्यानंतर निवडणूक आयोगाकडून शरद पवार गटाला तीन नावे आणि चिन्ह सुचवण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार शरद पवार गटाने आज निवडणूक आयोगात तीन नावे सुचवली होती. या तीन नावांपैकी शरद पवार गटाला राज्यसभा निवडणुकीसाठी ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार’ हे नाव देण्यात आलं आहे. दरम्यान, या सर्व घडामोडीनंतर आता जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटावर टीका केली आहे.