‘मुलीच्या हत्येची धमकी आल्यावर बापाला काय वाटलं असेल ?’ Jitendra Awhad यांची भावूक पोस्ट

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या मुलगी आणि जावायाला जिवे मारण्याची धमकी आल्याची धक्कादायक माहिती समोर आली. खरंतर जितेंद्र आव्हाड कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देणारी एक (Viral Audio) ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर (Social media) व्हायरल झाली होती. संबंधित ऑडिओ क्लिप ही ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांची असल्याचा आरोप करण्यात […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (23)

Jitendra Awhad

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या मुलगी आणि जावायाला जिवे मारण्याची धमकी आल्याची धक्कादायक माहिती समोर आली. खरंतर जितेंद्र आव्हाड कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देणारी एक (Viral Audio) ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर (Social media) व्हायरल झाली होती. संबंधित ऑडिओ क्लिप ही ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांची असल्याचा आरोप करण्यात आला. यावरुन आव्हाडांच्या समर्थकांनी आहेर यांना मारहाण केली होती. हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलं. (Viral Post) त्यानंतर आता जितेंद्र आव्हाड यांनी फेसबुकवर संबंधित ऑडिओ क्लिपसह आपली भूमिका मांडली आहे.

“ज्या नताशाला मी तीच्या जन्मानंतर साधं बोटही कधी लावलं नाही. किंवा ओरडलोही नाही. तीच्याबद्दल एक व्यक्ती फिल्डींग लावून मारुन टाकेन हे बोलतो. तेव्हा प्रचंड राग येतो. अस्वस्थता येते. तुम्हीच मला सांगा एक राजकीय नेता म्हणून हे सगळं सहन करायचं. एक पिता म्हणून हे सगळं सहन करायचं. आणि भूमिका काय घ्यायची ? घाबरुन घरी बसायचं, का उघडपणाने मैदानात यायचं. कोण आहे बाबाजी ? बाबाजी म्हणजे दाऊद इब्राहीमचा हस्तक. जे जे हत्या शुटआऊट मधील पहिल्या पाच जणांमधील एक आरोपी. स्वत:चं मुंबईमध्ये प्रचंड नाव असलेला. त्याच्या हस्तकांकरवी जावयाचा आणि मुलीचा मर्डर होणार. हे ऐकल्यानंतर एका बापाला काय वाटल असेल. राजकारण बाजूला ठेवा. पण, कधीतरी ह्या गोष्टीचा देखिल विचार करा, अशी भावनिक प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणावर दिलीय.

संबंधित कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली होती. “तो स्वत:च्या तोंडाने कबूल करतोय, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी दिली. एक गोष्ट मी टीव्हीवर माझ्या कुटुंबियांविषयी पाहिली की, माझ्या मुलीला स्पेनमध्ये मारणार आहेत. त्याकरिता बाबाजी नावाचा शूटर असणार, असं तो क्लिपमध्ये बोलतोय, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली होती.

जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले ?  

मला सकाळी माझ्या एका मित्राने ही ऑडिओ क्लिप आणून दिली. त्यामध्ये काही धक्कादायक बाबी आहेत. माझ्या मुलीपर्यंत किंवा जावयापर्यंत? पण माझ्या कुटुंबियांवर गोळ्या झाडणारा माणूस अजून या जगात पैदा व्हायचा आहे. त्याहीपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे मी 40 लाख दिवसाला जमा करतो, 20 लाख वाटतो, आणि सारखं त्याने बाबाजी आणि शूटर्सचं नाव घेतलंय”, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली होती.

माझ्या अंदाजाने जी माहिती मुंबईची आहे, मुंबईचा गँगवार जवळून बघितलेला मी माणूस आहे. हा बाबाजी म्हणजे सुभाष सिंग ठाकूर आहे. जो जे जे हत्याकांडातला एक आरोपी होता”, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला. बाबाजीच्या नावावर खूप गुन्हे आहेत. तसा तो कुप्रसिद्ध आहे. त्याच्या जीवावर हे सगळं शूटर्सचं प्लॅनिंग करतोय, हे तो बोलून दाखवतोय. नंतर म्हणतोय मी बाबाजींचं काम करणार आहे. हे सगळं जे काही चालू आहे त्याला लगाम घातला गेला नाही तर गैरकृत्यातून जमवलेली पैशांची थैली त्याने डोकं जड व्हायला लागतं. स्पेनमध्ये शूटर तयार ठेवलेत हे काय बोलणं झालं काय?”, असा सवाल त्यांनी केला.

Exit mobile version