Download App

मुंबईत पाणीकपात, जलबोगद्याच्या दुरुस्तीवर, जितेंद्र आव्हाडांनी मुख्यमंत्र्यांना फटकारलं 

ठाणे :  संपूर्ण मुंबईत ३१ मार्चपासून महिनाभर १५ टक्के पाणीकपात लागू करण्यात येणार आहे. मुंबईला पाणीपुरवठा (Water supply) करणाऱ्या जलबोगद्याला ठाणे येथे कुपनलिकेच्या खोदकामामुळे हानी पोहोचून गळती होत असल्याने दुरुस्तीकामासाठी हा निर्णय घेण्यात आला. मुंबई पालिकेच्या (Municipal Corporation) वतीने ठाणे शहराला होणाऱ्या पाणीपुरवठय़ातही कपात करण्यात आली आहे. जलबोगदा पाणीगळती दुरुस्तीचे काम शुक्रवारपासून सुरू करण्यात येणार आहे. यावरून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad ) यांनी मुख्यमंत्र्यांना सुनावल आहे.

वागळे इस्टेट येथे बोरींग मारली गेली, त्याकरता परवनागी दिली की नाही माहिती नाही. मुंबईचे रोज १० लक्ष लिटर पाणी वाया जाते ते कोणाला कळू नये म्हणुन पंप लावला गेला आणि नाल्यात पाणी सोडले जाते. हा बोगदा बंद करायचा असेल तर १५ दिवस बंद करावा लागेल. मुंबईत १५ दिवस पाणी बंद करावे लागेल. वागळे इस्टेट रोड नंबर १६ वर ठाण्यातील एका जबाबदार माणसाने बोरींग मारले आणि त्याला बोगदा पडला, हे मुख्यमंत्र्यांच्या मतदार संघातच असल्याचे टोला लगावला.

Maharashtra Politics: तानाजी सावंतांच्या ‘त्या’ विधानावर राजकीय वर्तुळात चर्चा!

त्यामुळे पाणी गढूळ येत आहे. तो बोगदा थांबवा आणि पाणी वाचवा शुद्ध पाणी द्या ही विनंती करतो, करत हजारो कोटींचा तो बोगदा आहे.  अज्ञान असल्याने हे चुकीचे काम झालय, यांत राजकारण आणू नका पण मुंबईकरांच्या तोंडचे पाणी पळवू नका. गेल्या ५ महिन्यात दीड कोटी लीटर पाणी वाया घालवलं आहे. यातून मोठा धोका निर्माण होवू शकतो. खड्डा तात्काळ बुझवा आणि मुंबईकरांचा वाचवा, याआधी देखील वागळे इस्टेट मधील मुंबईची पाईपलाईन फुटली होती आणि सर्विकडे पाणी फुटून लोकांचा जीव धोक्यात आला होता.

follow us