Download App

टिळा-टिकली लावू नका, अन्यथा.. कल्याणच्या केसी गांधी शाळेचा अजब फतवा, पालक आक्रमक

K C Gandhi School ने शाळेमध्ये कपाळावर टिळा किंवा टिकली हातामध्ये धागे किंवा बांगड्या घातल्यास कारवाई केली जाईल. असा फतवा काढला.

K C Gandhi Schools Strange Order for will punish for use of tilak and Bindi to Students in Kalyan : सर्वसामान्यपणे शाळांमध्ये गणवेश आणि इतर काही गोष्टींचे नियम पाळणे बंधनकारक असते. मात्र कल्याणमध्ये केसी गांधी या शाळेने विद्यार्थ्यांच्या वेशभूषेसाठी अजब नियम लावले आहेत. त्यामुळे पालक आक्रमक झाले असून शाळेने जारी केलेल्या या अबज फतव्याविरूद्ध आक्रमक पवित्रा घेतला गेला आहे. काय आहे हा नियम पाहुयात… 

केसी गांधी शाळेचा अजब फतवा

या शाळेने जारी केलेल्या पत्रकामध्ये म्हटलं आहे की, विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये येताना कपाळावर टिळा किंवा टिकली लावू नये. तसेच हातामध्ये धागे बांधू नये किंवा बांगड्या घालू नये. या नियमांचं पालनकेल्यास संबंधित विद्यार्थ्यांवर कारवाई केली जाईल. असा अजब फतवा केसी गांधी शाळेने काढला आहे. मात्र या अजब फतव्यानंतर पालक आक्रमक झाले आहेत. याबाबत आता आक्रमक झालेल्या पालकांनी केडीएमसीकडे तक्रार केली आहे. त्यावर केडीएससीने शाळेला नोटीस पाठवली आहे. या पत्रकासंदर्भात खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत.

लाडक्या प्राण्यांचे करता येणार अंत्यसंस्कार; राज्यातील पहिली पाळीव प्राणी अंत्यविधी स्मशानभूमीचे लोकार्पण

ठाकरे गट आक्रमक!

कल्याणमधील गांधी इंग्लिश स्कूलचा अजब फतवा समोर आलाय! विद्यार्थ्यांना कपाळावर टिळा किंवा टिकली लावू नका, राखी किंवा धार्मिक धागा बांधून शाळेत आलात तर कारवाई होईल, असा फतवा शाळा प्रशासनानं काढलाय. या निर्णयामुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळलीय. शिक्षण विभागानं शाळेला नोटीस बजावली असली, तरी आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आक्रमक झालाय. कारवाई झाली नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा ठाकरे गटानं दिलाय!

follow us