Download App

शिंदेंच्या मतदारसंघात भाजपाची घुसखोरी? रोहित पवार म्हणाले, श्रीकांत शिंदेंसह सर्वच खासदार..

Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पाडत अजित पवार सरकारमध्ये दाखल झाल्यानंतर पक्षातील दोन्ही गटातील वाद वाढला आहे. शरद पवार गटाचे नेते यासाठी भाजपलाच जबाबदार धरत आहेत. आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावरूनही राज्यातील राजकारण ढवळून निघालेले असतानाच आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी शिंदे गटाला डिवचले आहे. आ. पवार आज कल्याणमध्ये आहेत. येथे त्यांनी शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्यासह शिंदे गटाच्या सर्वच खासदारांवर निशाणा साधला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव डॉ. श्रीकांत शिंदे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे (Kalyan Lok Sabha Constituency) खासदार आहेत. या मतदारसंघात काही दिवसांपासून भाजप आणि शिंदे गटात वादाचे प्रसंग घडले आहेत. त्यातच या मतदारसंघावर भाजपकडून दावेदारी केली जात असल्याने शिंदे गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यात आता आ. पवार यांनी शिंदेंना डिवचणारे वक्तव्य केले आहे.

Sharad Pawar : ‘ते’ फोटो सोशल मीडियावर का वापराले? शरद पवारांची प्रफुल्ल पटेलांकडे नाराजी

मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे स्वतः ज्या मतदारसंघाचे खासदार आहेत तिथेच भाजप (BJP) बैठका घेत आहे. मतदारसंघावर दावा करत आहे. त्यामुळे भाजपाच्या मनात नेमकं काय चाललंय याचा काही प्रमाणात अंदाज येतो. ही जागा भाजप मागू शकतो किंवा श्रीकांत शिंदे यांच्यासह शिंदे गटाच्या सर्वच खासदारांना कमळावर निवडणूक लढवावी लागेल, असा दावा पवार यांनी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.

भाजपाची हीच प्रवृत्ती आहे लोकनेत्याला जवळ करायचे आणि संपवायचे. दुसऱ्या पक्षातून त्यांच्याकडे जे येतात त्यांनाही ते संपवतात. त्यामुळेच भाजपने आता श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. याचा काय अर्थ होतो. भाजपाच्या मनात काय आहे याचा अंदाज येतो.आज बैठका घेतील, उद्या भाजपवाले कल्याणच्या जागेवर दावाही करतील. त्यामुळे पुढे तर अशी परिस्थिती येईल की श्रीकांत शिंदेंसह त्यांच्या गटाच्या खासदारांना कमळाच्या चिन्हावर लढावे लागेल.

India Canada Conflict : अजेंडा 2024, आता भारत विरुद्ध कॅनडा; ठाकरे गटाकडून मोदी सरकार लक्ष्य

सुनील शेळके यांनी केलेल्या गौप्यस्फोटावरही त्यांनी उत्तर दिले. रोहित पवार यांनीच भाजपसोबत जाण्याची भूमिका शरद पवार यांच्याकडे मांडली होती, असा गौप्यस्फोट सुनील शेळके यांनी केला होता. त्यावर पवार म्हणाले, सुनील शेळके आमचे मित्र आहेत. त्यांचं विधान हास्यास्पद आहे. त्यांचं पूर्ण स्टेटमेंट मी ऐकलं नाही. त्यांचे वक्तव्य आधी पूर्ण ऐकेन मगच यावर प्रतिक्रिया देईल.

Tags

follow us