Download App

Mumbai News : डेक्कन एक्सप्रेस पकडताना कल्याण स्थानकावर अपघात; एकाचा मृत्यू

  • Written By: Last Updated:

मुंबई : मुंबईतील कल्याण स्थानकावर अपघात होऊन एका प्रवाशाचा मृत्यू तर, एक प्रवाशी गंभीर जखमी झाल्याचे वृत्त समोर आले आहे. डेक्कन एक्सप्रेस पकडताना किंवा त्यातून उतरताना हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे. स्थानकावरील सात नंबर प्लॅटफॉर्मवर हा अपघात घडला असून, यात दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

डेक्कन एक्सप्रेस ही रेल्वे पुणे-मुंबई दरम्यान धावते. या गाडीला कल्याण रेल्वे स्थानकावर थांबा नाहीये. मात्र, कल्याण स्थानकादरम्यान या गाडीचा वेग काहीसा कमी केला जातो. याचदरम्यान अनेक प्रवाशी धावत्या रेल्वेतून उतरण्याचा किंवा गाडीत चढण्याचा प्रयत्न करतात. यावेळी अपघाताची दाट शक्यता असते. आजची घटनाही याच प्रयत्नात झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, डेक्कन एक्सप्रेस कल्याण स्थानकात आली असता त्यावेळी काही प्रवाशांनी गाडीत चढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अचानक पाय घसरल्याने हे प्रवासी रेल्वे रूळावर पडले. यात एकाचा मृत्यू झाला असून, इतर दोघे गंभीर जखमी असल्याचे सांगितले जात आहे. ही घटना स्थानकातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

डेक्कन एक्सप्रेस पुणे ते मुंबई दरम्यान दररोज धावते. यातून लाखो प्रवासी प्रवास करतात. नेहमीप्रमाणे सकाळच्या सुमारास या गाडीने पुण्याहून मुंबईकडे प्रयाण केले. या गाडीला कल्याण स्थानकावर थांबा नाहीये. मात्र, ज्यावेळी ही गाडी कल्याण स्थानकातून पुढे जात असते त्यावेळी तिचा वेग काहीसा कमी केला जातो. याचवेळी अनेक प्रवासी हे रेल्वेत चढण्याचा आणि उतरण्याच्या प्रयत्नात असतात.

आज ही गाडी कल्याण स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 7 मधून पुढे जात होती. त्यावेळी काही प्रवाशांनी रेल्वेत चढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अचानाक पाय घसरल्याने यातील तीन प्रवासी रेल्वे रूळावर पडले. यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर, अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर स्थानकावर मोठा गोंधळ उडाला. अपघातात जखमींना जवळील रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.

 

Tags

follow us