Download App

Lalbag Raja Visarjan : तब्बल 22 तासांनी नवसाला पावणाऱ्या लालबागच्या राजाला निरोप; कोळी बांधवांनी दिली सलामी

  • Written By: Last Updated:

Lalbag Raja Visarjan : नवसाला पावणाऱ्या मुंबईतील लालबागच्या राजाला (Lalbag Raja Visarjan) तब्बल 22 तासांच्या विसर्जन मिरवणुकीनंतर निरोप देण्यात आला आहे. राज्यभरात गुरूवारी गणरायाला निरोप देण्याासाठी उत्साहाचं वातावरण होतं. मुंबई, पुणे, मराठवाडा, विदर्भात ढोल-ताशाच्या गजरात निरोप दिला गेला आहे. त्यामध्ये लालबागच्या राजाला तब्बल 22 तासांच्या विसर्जन मिरवणुकीनंतर निरोप देण्यात आला आहे.आज सकाळी 9.15 ला लालबागच्या राजाचं विसर्जन पार पडलं. गिरगावच्या समुद्रात हे विसर्जन करण्यात आलं.

Mumbai सेन्सॉर बोर्डाने लाच घेतल्याचा आरोप; अभिनेत्याची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

समुद्राला ओहोटी आल्याने विसर्जनाला विलंब

गुरूवारी अनंज चतुर्दशीच्या दिवशी सकाळी 11.30 वाजता लालबागच्या राजाच्या विसर्जन (Lalbag Raja Visarjan) मिरवणुकीला सुरूवात झाली होती. त्यानंतर मुंबईत विविध ठिकाणी राजाचं स्वागत आणि दर्शनासाठी जनसागर उसळला होता. त्यानंतर आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर पोहचला मात्र समुद्राला ओहोटी आल्याने विसर्जनाला विलंब झाला. जेव्हा समुद्राला भरती आली जेव्हा लालबागच्या राजाला तराफ्यावर ठेवण्यात आलं. आरतीनंतर बाप्पा विसर्जनासाठी मार्गस्थ झाले.

Sharad Pawar : ‘हा तर पत्रकारांना बेइज्जत करण्याचा प्रकार’; पवारांनी टोचले बावनकुळेंचे कान

कोळी बांधवांची बप्पाला सलामी

जेव्हा समुद्राला भरती आली जेव्हा लालबागच्या राजाला तराफ्यावर ठेवण्यात आलं. आरतीनंतर बाप्पा विसर्जनासाठी (Lalbag Raja Visarjan) मार्गस्थ झाले. यावेळी कोळी बांधवांनी लालबागच्या राजाला बोटींची सलामी दिली. यावेळी समुद्रात विलेभनीय दृश्य पाहायला मिळाले. ज्यामध्ये मध्ये तराफ्यावर लालबागचा राजा होता. तर आसपास कोळी बांधवांच्या बोटी होत्या.

धक्कादायक! सांस्कृतिक पुण्यात सर्रासपणे बेकायदेशीर विदेशी तरूणींच्या ‘अरेबियन नाईट्स’ चं आयोजन

दरम्यान या विसर्जन मिरवणुकीला पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. तसेच दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील लालबागच्या राजाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दर्शनासाठी हजेरी लावली होती. त्यामध्ये बॉलिवूडच्या कलाकारांचा राजकीय नेत्यांचा आणि उद्योजकांचा समावेश होता.

Tags

follow us

वेब स्टोरीज