Sharad Pawar : ‘हा तर पत्रकारांना बेइज्जत करण्याचा प्रकार’; पवारांनी टोचले बावनकुळेंचे कान

Sharad Pawar : ‘हा तर पत्रकारांना बेइज्जत करण्याचा प्रकार’; पवारांनी टोचले बावनकुळेंचे कान

Sharad Pawar : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांसंदर्भात नगर शहरात केलेले एक वक्तव्य चांगलेच चर्चेत आहेत. या वक्तव्याने भाजप बॅकफूटवर गेला आहे तर विरोधकांनी जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत बावनकुळे यांचे कान टोचले आहेत. शरद पवार यांनी आज बारामती दौऱ्यावर आहेत. येथे त्यांनी गोविंद बाग निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला.

छगन भुजबळांच्या पुतण्याकडे मुंबईची जबाबदारी, नवाब मलिकांना धक्का

यावेळी त्यांनी भाजप आणि मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला. बावनकुळे यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत त्यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, बावनकुळेंच्या वक्तव्याला फारसं महत्व देण्याची गरज नाही. आता काय त्या विधानाला महत्व द्यायचं एवढं. महाराष्ट्रातले पत्रकार या गोष्टींची अपेक्षा करत नाहीत. महाराष्ट्रातले कोणते पत्रकार ढाब्यावर जाण्यासाठी, चहासाठी भुकेले आहेत? महाराष्ट्राच्या पत्रकारांची तशी प्रतिमा नाही. असं वक्तव्य करणं म्हणजे समस्त पत्रकार वर्गाचा अवमान आहे. अशी भूमिका जे घेतात, त्यांच्याबद्दल काय बोलावं. मला वाटतं अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करायला हवं असे पवार म्हणाले.

नेमकं काय म्हणाले होते बावनकुळे ?

बावनकुळे यांनी काही दिवसांपूर्वी नगर शहरातील सावेडी येथे भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. निवडणुकीवरही चर्चा झाली. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना माध्यम प्रतिनिधी वा पत्रकारांना कसं हाताळायचं, यावर चंद्रशेखर बावनकुळेंनी वक्तव्य केले होते. पत्रकारांनी 2024 पर्यंत आपल्याविरोधात (भाजपा) बातम्या छापू नये, यासाठी त्यांना चहा प्यायला न्या. पत्रकारांना चहा प्यायला न्यायचं म्हणजे काय ते तुम्हाला समजलं असेल. तसेच पत्रकारांना ढाब्यावर जेवायला घेऊन जा, असं वक्तव्य बावनकुळेंनी केलं होतं. याची एक ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली होती. वक्तव्य अंगलट येत असल्याचे लक्षात येताच बावनकुळेंनी सारवासारवही केली होती. मात्र, विरोधकांनीही बावनकुळेंना निशाण्यावर घेतले.

Rohit Pawar यांच्या कंपनीवर कारवाई का केली ? शरद पवार गटाचा भाजप अन् अजितदादांकडे रोख

पवारांचा मोदी सरकारला इशारा

केंद्र सरकारने कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क लावले आहे. याचा मोठा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसतो आहे. मुळात कांदा हे जिरायती पीक आहे. त्यामुळे केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय अत्यंत चुकीचा आहे. या संदर्भात आता केंद्रीय मंत्री पियुष गोयल बैठक घेणार आहेत. त्यात या प्रश्नावर तोडगा निघाला तर आनंदच आहे. अन्यथा शेतकऱ्यांची अस्वस्थता थांबवता येणार नाही, असा इशारा पवार यांनी दिला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube