Rohit Pawar यांच्या कंपनीवर कारवाई का केली ? शरद पवार गटाचा भाजप अन् अजितदादांकडे रोख

Rohit Pawar यांच्या कंपनीवर कारवाई का केली ? शरद पवार गटाचा भाजप अन् अजितदादांकडे रोख

Rohit Pawar : राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या बारामती ॲग्रो या कंपनीवर राज्य सरकारकडून कारवाई करण्यात आली आहे. मध्यरात्री दोन वाजता महाराष्ट्र प्रदूषण विभागाने नोटीस देत 72 तासांत दोन प्लांट बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. स्वतः रोहित पवार यांनी या कारवाईबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी दोन मोठ्या नेत्यांच्या सांगण्यावरुन ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप केला आहे. यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. शरद पवार गटाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

केवळ आणि केवळ सूडबुद्धीने रोहित पवारांच्या कंपनीवर कारवाई करण्यात आली. रोहित पवार हे सातत्याने भाजप आणि अजितदादा गटाला विरोध करत असल्यानेच ही कारवाई केली, असा आरोप तपासे यांनी केला. रोहित पवार यांच्यावर ही कारवाई सूडबुद्धीनेच केली गेली आहे. रोहित पवारांचा दोष इतकाच आहे की आजोबांची काठी पकडून ते महाराष्ट्रात आणि देशात भाजपाच्या राजकारणाला विरोध करत आहेत. शरद पवारांच्या विचारांना जे सोडून गेले, त्यांना रोहित पवार विरोध करत आहेत. त्यामुळेच राज्य सरकारच्या विभागाने ही कारवाई केली, असा आरोप तपासे यांनी केला.

Manipur : मणिपुरात पुन्हा जाळपोळ! संतप्त जमावाने भाजप कार्यालयाला लावली आग

काय म्हणाले रोहित पवार?

राज्यातील दोन मोठ्या नेत्यांच्या सांगण्यावरून कुठला तरी द्वेष मनात ठेवून आज पहाटे दोन वाजता राज्य शासनाच्या एका शासकीय विभागाच्या माध्यमातून माझ्या कंपनीच्या एका विभागावर कारवाई करण्यात आली.

युवा मित्रांना एकच सांगू इच्छितो की, संघर्ष करतांना भूमिका घेताना अनेक अडचणींचा सामना करावाच लागतो. मी बोलतो, ठोस भूमिका घेतो म्हणून मला अडचणीत आणण्यासाठी आता प्रयत्न सुरू झाले आहेत, परंतु अडचणी आल्या म्हणून संघर्ष थांबवायचा नसतो. भूमिका आणि निष्ठा बदलायची नसते ही मराठी माणसाची खासियत आहे.

हा लढा मी लढणारच आहे, परंतु ज्यांच्या सांगण्यावरून माझ्यावर कारवाई करण्यात येत आहे त्यांना एकच सांगायचंय की, मी आधी व्यवसायात होतो नंतर राजकारणात आलो, परंतु आधी राजकारणात येऊन आणि नंतर व्यवसायात आर्थिकदृष्ट्या बलाढ्य झालेले अनेक जण आहेत. त्यामुळे या नेत्यांना अपेक्षित असलेले काहीही साध्य होणार नाही. तसेच हे द्वेषाचं राजकारण आजच्या पिढीला पटणारंही नाही.

बारामती ॲग्रोवर मध्यरात्री 2 वाजता कारवाई; वाढदिवसानिमित्तच्या ‘गिफ्ट’साठी रोहित पवारांनी मानले आभार

आपण सत्याच्या बाजूने आहोत आणि केवळ राजकीय सुडापोटी ही कारवाई होत असल्याने माझ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आणि कुटुंबाने काळजी करण्याची गरज नाही. माझ्या वाढदिवसानिमित्त ‘गिफ्ट’ दिल्याबद्दल सरकारचे आभार मानतो, परंतु राज्यातली युवा आणि जनता सरकारला नक्कीच ‘रिटर्न गिफ्ट’ देईल, ही खात्री आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube