लेट्सअपच्या दिवाळी अंकाचे CM फडणवीसांच्या हस्ते प्रकाशन; ‘लक्षवेधी महाराष्ट्रीय’मुळे अंक वेगळ्या उंचीवर

LetsUpp Diwali Ank: यंदाच्या अंकांचे वैशिष्ट्येही खास आहे. हा अंक महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचा वारसा या विषयाला वाहण्यात आलेला आहे.

Letsupp Diwali Ank

Letsupp Diwali Ank

LetsUpp Diwali Ank 2025 Published By CM Devendra Fadnavis : दिवाळी अंकांतील परंपरेत आपलं नाव अल्पावधित कोरणाऱ्या ‘लेट्सअप दिवाळी अंक 2025’ चे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. सोशल माध्यम जगतामध्ये बुलंद आवाज असलेल्या ‘लेट्सअप’चा हा तिसरा दिवाळी अंक आहे. यंदाच्या अंकांचे वैशिष्ट्येही खास आहे. हा अंक ‘महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचा वारसा’ या विषयाला वाहण्यात आलेला असून, ‘लक्षवेधी महाराष्ट्रीय’मुळे अंक वेगळ्या उंचीवर आहे. महाराष्ट्रात गेल्या वर्षभरामध्ये वादळी कारकीर्द करणाऱ्या क्रीडा, राजकारण, समाजकारण, उद्योगव्यवसाय इतर क्षेत्रातील 25 दिग्गज महाराष्ट्रीय व्यक्तींची करून दिलेली ओळख हे या अंकाचे बलस्थान आहे.

लेट्सअपचा दिवाळी अंक सर्वांगीण दृष्टीने वाचनीय – फडणवीस

लेट्सअप दिवाळी अंकाचे (LetsUpp Diwali Ank) प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांच्या हस्ते मंत्रालयात झाले. मुख्यमंत्र्यांनी अंकांचे कौतुक करत हा दिवाळी अंक सर्वांगीण दृष्टीने वाचनीय असल्याचे म्हटलंय. यावेळी सोहम ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक अमित बुरा, लेट्सअपचे संपादक योगेश कुटे, बिझनेस हेड प्रणित मेढे, प्रतिनिधी प्रशांत गोडसे, अमोल जायभाय, वैभव पाटील आदी उपस्थित होते. ‘लक्षवेधी महाराष्ट्रीय’ या भागाचे मुख्य प्रायोजक लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड आहे. तर सहप्रायोजक ‘ग्रॅव्हिट्‌स फाउंडेशन’ व मालपाणी उद्योग समूह आहे. हा दिवाळी अंक अॅमेझॉन आणि राज्यातील पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध झालाय.

‘लक्षवेधी महाराष्ट्रीय’मधील वादळी व्यक्तिमत्वे

दिवाळी अंकात 25 वादळी व्यक्तिमत्वाचं कारकीर्द तुम्हाला वाचायला मिळणार आहे. चौसष्ट घरांची जगज्जेती साम्राज्ञी दिव्या देशमुख, देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई, गडचिरोलीचे पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, गरीब मराठ्यांचा मसीहा असलेले मनोज जरांगे, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, झेडपीच्या शाळेला जगाच्या पाठीवर नेणारे ग्लोबल गुरुजी दत्तात्रय वारे, संतोष देशमुख यांचे मुलगी वैभवी देशमुख, बँकिंग तज्ज्ञ व राज्य सहकारी बँकेला उभारी देऊन नफ्यात आणणारे प्रशासक विद्याधर अनास्कर, शून्यातून अब्जाधीश अस प्रवास करणारे बेलराईज इंडस्ट्रीज लिमिटेडचे प्रमोटर आणि व्यवस्थापकीय संचालक श्रीकांत बडवे यांचा जीवनप्रवास तुम्हाला वाचायला मिळणार आहे. तर व्यवसायामध्ये पीएनजी ज्वेलर्सला एका वेगळ्या उंचीवर नेणारे सौरभ गाडगीळ, समाजकारणामध्ये मराठी भाषेसाठी आवाज उठविणारे डॉ. दीपक पवार, साहित्यामध्ये प्रदीप कोकरे, डॉ. सुरेश सावंत, कलामध्ये क्षितिज पटवर्धन, सिनेमासृष्टीतील दिलीप प्रभावळकर, छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्याविषयी लेख वाचायला मिळणार आहे.

पहिल्यांदाच आमदार झालेले ‘दमदार’ व्यक्तिमत्वे

राजकारणात पहिल्यांदा आमदार झालेले वरुण सरदेसाई, फुलंब्रीच्या आमदार अनुराधा चव्हाण, माढ्याचे आमदार अभिजित पाटील, श्रीरामपूरचे आमदार हेमंत ओगले, संगमनेरचे आमदार अमोल खताळ, कसब्याचे आमदार हेमंत रासने, माध्यमामध्ये रिअल लाइफचा विनोदवीर ऋषी हराळ, कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे, ‘फोक लोक’ या बँडविषयी तुम्हाला वाचायला मिळणार आहे.

संघाच्या शताब्दीवर लेख

राष्ट्रीय स्वंयसेवक संघ शताब्दी वर्ष साजर करतंय. पण कोणत्या त्रिसूत्रीमुळे संघ शंभर वर्षें टिकला यावर ज्येष्ठ संपादक प्रशांत दीक्षित यांचा लेख. शिवराज्यातील युनेस्कोने निवडलेल्या किल्ल्यांविषयी, महाराष्ट्रतील आवर्जून पाहावी अशी 12 मंदिर आहेत तरी कोणती हे सांगणारे मूर्तीतज्ज्ञ डॉ. गो. बं. देगूलकर. बदलत्या ग्रामीण महाराष्ट्राचं वास्तव सांगणारा प्रा. जयदेव डोळे यासह शेती, पुस्तक क्षेत्र, सिनेसृष्टीतील लेख तुम्हाला वाचायला मिळणार आहे.

Exit mobile version