मुंबई: वनविभागाच्या जमिनीवर (Forest land) स्वत:चे नाव लावून कब्जा केला. त्यानंतर ही जमीन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला हस्तांतरीत करत मोबदला लाटल्याप्रकरणी कंत्राटदार व स्थानिक भाजप नेते जे. एम. म्हात्रेला ( J. M. Mhatre ) ईडीने (ED) मोठा दणका दिलाय. याप्रकरणी ईडीने म्हात्रे व त्याच्या पत्नीविरुद्ध मनी लॉंड्रिंगचा गुन्हा दाखल केलाय. त्याचबरोबर 18 कोटी रुपयांची मालमत्ताही ईडीने जप्त केलीय. नवी मुंबईतील उरण आणि उलवे परिसरात तीन भूखंड जप्त करण्यात आले आहेत.
फेरफार करत जमीन नावावर केली
1975 मध्ये निजामाच्या जमिनीचा ताब्या महाराष्ट्र शासनाने घेतला होता. त्यानंतर सरकारने ही ही जमीन वनविभागाकडे वर्ग केली होती. या जमिनीच्या सातबारा आणि फेरफार नोंदणीत वनविभागाचे नाव नोंदविण्यात आले होते. परंतु म्हात्रेने कागदपत्रांमध्ये फेरफार करत 376 एकर जमीन स्वत: च्या नावावर केली. त्यानंतर ही जमीन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला हस्तांतरीत करत तब्बल 42 कोटी 40 लाख रुपयांचा मोबदला घेतला होता. ही बाब उघडकीस आल्यानंतर 24 सप्टेंबर 2024 ला वनविभागाने पनवेल शहर पोलिस ठाण्यात म्हात्रे व कादरीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता. गुन्हा नोंदविण्यापूर्वी वनविभागाने भूसंपादनाचे पैसे वनविभागाकडे वर्ग केले पाहिजे, अशी मागणी वनविभागाच्या अधिकाऱ्याने केले होते. परंतु पैसे परत केले जात नसल्याने उरण तालुक्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी नथुराम कोकरे यांनी तक्रार दाखल केली होती.
CBSC Exam : ‘ऑन-स्क्रीन मार्किंग सिस्टम’ ने उत्तरपत्रिकांची होणार चेकिंग; नेमका फायदा कुणाला?
मालमत्ता घेतली, कर्जही फेडले
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून मिळालेल्या पैशातून म्हात्रे याने मालमत्ता खरेदी केली, तसेच कर्जाची परतफेड केल्याचे ईडीच्या तपासात आढळून आले आहे. या प्रकरणी ईडीने आतापर्यंत कंत्राटदार म्हात्रेकडून 69 कोटी 47 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. जेएम म्हात्रे इन्फ्रास्ट्रक्चरचे जेएम म्हात्रे आणि सय्यद मोहम्मद अब्दुल हमीद कादरी यांची चौकशी करत आहेत. वर्षभरापासून ईडी म्हात्रेविरुद्ध कारवाई करत आहे. त्याच्याकडून साडेसोळा लाख रुपयांची बेहिशबी रोकड जप्त करण्यात आलीय. तसेच बँक बॅलन्स, मुदत ठेवी आणि म्युच्युअल फंड गोठविले आहेत.
रोहित पवारांच्या दाव्याला हिंदुरावांचा दुजोरा; शेवटच्या क्षणी का घेतला विमान प्रवासाचा निर्णय?
कोण आहेत जे. एम. म्हात्रे ?
जे. एम. म्हात्रे हा राजकारणातही आहे. म्हात्रे पूर्वी शेतकरी कामगार पक्षात होता. त्याचा मुलगा प्रीतमने याने उरण मतदारसंघातून भाजपच्या महेश बालदी यांच्याविरोधात निवडणूक लढविली होती. विधानसभा निवडणुकीनंतर म्हात्रे पिता-पुत्रांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. म्हात्रे यांची कंपनी बांधकाम क्षेत्रात असून, नवी मुंबई, उरण-पनवेल, सिडको, विमानतळ, नॅशनल हायवे काॅर्पाेरेशनसह एमएसआरडीसी आणि इतर प्राधिकरणांची हजारो कोटींची कंत्राटे घेतलेली आहेत.
