मुंबई : ठाकरे गटाचे नेते, माजी मंत्री भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी विधानसभेत बोलत असताना सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. मी राजकारणातून निवृत्ती घेऊन मुलाला तिकीट द्या, असे शरद पवार (Sharad Pawar) यांना सांगितले होते. पण शरद पवार यांनी मला निवृत्तीपासून परावृत्त केले. काही दिवसाअगोदर भाजपाच्या (BJP) एका नेत्याने मला तुरुंगात टाकण्याचे वक्तव्य केले. मला तुरुंगात टाकले तरी मी घाबरणार नाही.
https://www.youtube.com/watch?v=BERIduaZOvg
या भाजपच्या नेत्याने माझ्या मुलांचे नाव घेऊन चुकीचा उल्लेख केला. तुम्ही जर कुटुंबावर येणार असाल तर नियती तुम्हाला माफ करणार नाही, जे व्हायचे असेल ते होईल, पण मी गुडघे टेकणार नाही, अशी आक्रमक भूमिका भास्कर जाधव यांनी विधानसभेत मांडली. तसेच भाजपाला देशात आणि राज्यात दिसणार यश हे विरोधी पक्षातील मोठे नेते आपल्या पक्षात घेतलं म्हणून दिसत आहे. त्यानंतर भाजपाच्या नेतृत्वाच्या डोक्यात हवा गेली. त्यातून भाजपाच्या मूळ विचारधारेचा कार्यकर्ता दुखावला गेला. त्याने कसब्याची जागा ही काँग्रेसने जिंकून आणली.
Chinchwad Election Live : तब्बल 27 हजार मतांनी अश्विनी जगताप आघाडीवर तर नाना काटे…
त्यामुळे भाजपाच्या अहंकारी नेत्यांच्या डोळ्यात त्यांच्याच लोकांनी झणझणीत अंजन घातलं, असेही भास्कर जाधव यांनी सांगितलं. भाजपा आणि शिंदे गटातील सर्व मंत्री कसब्यात बसले होते. सगळी शक्ती, युक्ती, सत्ता, मस्ती, सत्तेचा मलिदा त्याठिकाणी प्रचंड प्रमाणात वाटला गेला. परंतु, धनशक्तीपेक्षा जनशक्ती मोठी आहे,” असा टोला भास्कर जाधव यांनी भाजपाला लगावला आहे.