Download App

“हेमंत करकरेंना लागलेली गोळी कसाबची नाही, RSS समर्पित अधिकाऱ्याची”; वडेट्टीवारांच्या वक्तव्याने वाद पेटला

आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांना लागलेली गोळी ही दहशतवाद्याच्या बंदुकीतील नव्हती तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी समर्थित अधिकाऱ्याने झाडली होती.

Image Credit: letsupp

Vijay Wadettiwar : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आज केलेल्या (Vijay Wadettiwar) वक्तव्याने थेट देशातील राजकारण ढवळून निघालं आहे. आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांना (Hemant Karkare) लागलेली गोळी ही दहशतवाद्याच्या बंदुकीतील नव्हती तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी समर्थित अधिकाऱ्याने (RSS) झाडली होती, असा खळबळजनक दावा विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत केला. या वक्तव्यानंतर वडेट्टीवार यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. भाजप नेते तर अक्षरशः तुटून पडले आहेत.

‘सूरत’, ‘इंदूर’नंतर ‘पुरी’तही काँग्रेसवर नामुष्की; पैसे नाहीत म्हणून उमेदवाराची माघार

ज्यावेळेस हेमंत करकरे यांचा खून झाला ती गोळी कसाबच्या बंदुकीतली नव्हती. कुठल्या अतिरेक्याची नव्हती. तर ती गोळी एका आरएसएस समर्पित अधिकाऱ्याची होती. त्यावेळचे पुरावे लपवणारा जो कुणी देशद्रोही कोण असेल तर तो उज्ज्वल निकम आहे. अशा देशद्रोह्याला जर भारतीय जनता पार्टी तिकीट देत असेल तर देशद्रोह्यांना पाठिशी घालणारा हा पक्ष आहे का असा सवाल वडेट्टीवार यांनी विचारला.

त्यानंतर या विधानावर त्यांनी स्पष्टीकरणही दिले. एस. एम. मुश्रीफ यांच्या पुस्तकाचा दाखला देऊन केल्याचे वडेट्टीवार म्हणाले. यामध्ये मी काहीही म्हटलं नाही. विलासराव देशमुखांनी त्यावेळी सांगितलं होतं की कसाबला फाशी झाली याचं श्रेय घेण्याची गरज नाही. कारण तो दहशतवादी होता त्याला फाशी होणारच होती. त्यामुळे यात बडेजावणा दाखवण्याची गरज नाही. मी हे एस. एम. मुश्रीफ यांच्या पुस्तकाचा दाखला देऊन बोललो आहे. यावर त्यांना (उज्ज्वल निकम) काही खुलासा करायचा असेल तर त्यांनी करावा असेही वडेट्टीवार म्हणाले.

Eknath Khadase यांच्या प्रवेशाला ग्रीन सिग्नलची गरज नाही, आमचा दुपट्टा तयार; बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं

काँग्रेसवाल्यांच्या तोंडी पाकिस्तानची भाषा, त्यांना औकात दाखवू : फडणवीस

उज्ज्वल निकम यांच्यासारख्या देशभक्ताला सीट दिली तर हे काँग्रेस राष्ट्रवादीवाले विरोधी पक्षनेते म्हणतात उज्ज्वल निकम यांनी अजमल कसाबची बदनामी केली. आता यांना अजमल कसाबच्या बदनामीची चिंता आहे. या कसाबने मुंबईत येऊन बॉम्बस्फोट केले त्या कसाबची यांना चिंता आहे. महायुती उज्ज्वल निकम यांच्या पाठिशी आहे. तर महाविकास आघाडी कसाबच्या मागे आहे. आता तुम्हाला निर्णय करायचा आहे. काँग्रेस पाकिस्तानची भाषा बोलत आहे. महाराष्ट्र त्यांना कधीही माफ करणार नाही. पाकिस्तानची भाषा बोलणाऱ्यांना त्यांची औकात दाखवून दिली पाहिजे.

दहशतवादी कसाबची बाजू घेता, थोडी तरी लाज बाळगा : बावनकुळे

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पु्न्हा एकदा अकलेचे तारे तोडत पाकिस्तानधार्जिणी भूमिका घेतली. शहीद हेमंत करकरे यांच्यावर चाललेली गोळी पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाबची नव्हती असा जावईशोध त्यांनी लावला. निवडणुकीत मतं मिळवण्यासाठी काँग्रेस किती खालच्या पातळीला जाणार? भाजपला विरोध करण्यासाठी तु्म्ही 26/11 मुंबई हल्ल्यातील दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा. काँग्रेस आणि विजय वडेट्टीवार यांच्या पाकधार्जिण्या भूमिकेबद्दल जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.

follow us

वेब स्टोरीज