Download App

आशिष शेलारांच्या भावाला तिकीट मिळताच भाजपात नाराजीनाट्य; थेट PM मोदींनाच धाडले पत्र

विनोद शेलार यांच्या उमेदवारीला भाजपातून तीव्र विरोध होऊ लागला आहे. थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे.

Maharashtra Elections 2024 : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने (Maharashtra Elections 2024) पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत भाजपाचे मुंबई अध्यक्ष अॅड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांचे बंधू विनोद शेलार यांना मालाड पश्चिममधून उमेदवारी जाहीर करण्यात आली. आशिष शेलार यांनी भावासाठी तिकीट मिळवलं असलं तरी यातून भाजपात असंतोष वाढल्याचं दिसून येत आहे. विनोद शेलार यांच्या उमेदवारीला भाजपातून तीव्र विरोध होऊ लागला आहे. विरोध इतका वाढला आहे की थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पत्र लिहून नाराजी कळविण्यात आली आहे. या नाराजीनाट्यामुळे निवडणुकीच्या आधीच विनोद शेलार यांची वाट बिकट झाल्याचे दिसून येत आहे.

मुंबईतील 14 जागांवर भाजपचे उमेदवार जाहीर; आशिष शेलारांसह त्यांचे मोठे बंधू विधानसभेच्या रिंगणात

भाजपकडून मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघातून विनोद शेलार यांना जरी उमेदवारी घोषित करण्यात आली असली तरी, भाजपा कार्यकर्त्यांकडे त्यांच्या उमेदवारीला विरोध होत असून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच त्यांनी पत्र पाठवून आपली नाराजी कळवली आहे. बाहेरचा उमेदवार मुद्दा उपस्थित करून मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार दहा ते पंधरा टक्के मते मिळवतात असा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई शहराध्यक्ष आशिष शेलार यांच्यासमोर स्थानिक कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्याचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे.

मालाड विधानसभेत बाहेरचा उमेदवार लादला जात असल्याने स्थानिकांत नाराजी आहे. मागील पाच टर्म मालाड बाहेरील लोकांना विधानसभा निवडणुकीत तिकीट दिलं जात आहे. त्यामुळे येथील जनतेत आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांत नाराजी आहे. प्रतिस्पर्धी उमेदवाराकडून निवडणुकीत हाच मुद्दा उपस्थित केला जातो. हा मुद्दा निवडणुकीत महत्वाचा ठरतो. त्यामुळे याबाबत विचार व्हावा, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.

कोण आहेत विनोद शेलार ?

विनोद शेलार हे मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांचे मोठे बंधू आहेत. 2012 ते 2017 कालावधीत त्यांनी पालिका नगरसेवकपद भूषविले आहे. पहिल्यांदाच विनोद शेलार आमदारकीची निवडणूक लढवणार आहेत. 2019 साली मालाड पश्चिम मतदारसंघातून त्यांचे नाव चर्चेत होते मात्र त्याच वेळी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार रमेशसिंग ठाकूर यांनी भाजपात प्रवेश करून भाजपाच्या तिकिटावर मालाड पश्चिम मतदार संघातून निवडणूक लढवली.

धनंजय महाडिकांच्या मुंबईत भेटीगाठी; कोल्हापूर उत्तरमध्ये क्षीरसागर उमेदवारी अर्ज भरण्याच्या तयारीत

मात्र त्यांना काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार अस्लम शेख पराभूत केले होते. विनोद शेलार यांच्या पुढे सलग तीन वेळा विजयी हॅट्रिक करणारे काँग्रेस पक्षाचे आमदार अस्लम शेख तगडे प्रतिस्पर्धी असणार आहेत. गेल्या दहा वर्षांपासून मतदारसंघ बांधण्याचे काम विनोद शेलार करत आले आहे. त्यामुळे आता विनोद शेलार यावेळी काय करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

follow us