Download App

सावधान! आज पुणे-मुंबईसह 7 जिल्ह्यांत ‘कोसळधार’; हवामान खात्याने दिला ‘हा’ इशारा

Weather Update : राज्यात मान्सूनचा पाऊस दमदार बरसत आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागात पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. पुरासाराखी परिस्थिती अनेक ठिकाणी निर्माण झाली आहे. आजही राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम राहणार आहे. पुढील पाच दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र, पूर्व विदर्भाच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार पाऊस होईल. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यांनाही पावासाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर संपूर्ण विदर्भासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

कोल्हापुरात पावसाचा कहर; पंचगंगेने इशारा पातळी ओलांडली, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

आज राज्यात एकूण सात जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.  ठाणे,  पुणे, मुंबई, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच उद्या राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सध्या सगळीकडेच ढगाळ हवामान असून हवेत गारठा वाढला आहे. त्यामुळे सर्दी, खोकल्याचे रुग्णही घरोघर आढळून येत आहेत.

Tags

follow us

वेब स्टोरीज