BMC Elections: ठाकरे गटाची चांदी, राष्ट्रवादीही साधणार डाव? अजितदादांनी केला मोठा खुलासा

BMC Elections : निवडणुका जवळ येत असताना महाविकास आघाडीत दबावाचे राजकारण सुरू झाले आहे. मु्ंबई महानगरपालिका (BMC Elections) निवडणुकांसंदर्भातत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मोठा दावा केला आहे. ज्यामुळे भाजपचे टेन्शन वाढू शकते. नुकत्याच झालेल्या सर्व्हेत असे दिसून आले आहे की शिवसेनेला (उबाठा) मुंबईत जास्त जागा मिळतील, असे अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले. आगामी मुंबई […]

Ajit Pawar And Uddhav Thackeray

Ajit Pawar And Uddhav Thackeray

BMC Elections : निवडणुका जवळ येत असताना महाविकास आघाडीत दबावाचे राजकारण सुरू झाले आहे. मु्ंबई महानगरपालिका (BMC Elections) निवडणुकांसंदर्भातत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मोठा दावा केला आहे. ज्यामुळे भाजपचे टेन्शन वाढू शकते. नुकत्याच झालेल्या सर्व्हेत असे दिसून आले आहे की शिवसेनेला (उबाठा) मुंबईत जास्त जागा मिळतील, असे अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक संयुक्तपणे लढण्याचा प्रस्ताव आपण शिवसेनेला दिला आहे. मुंबईकरांना उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूती आहे. आम्ही उद्धव ठाकरे यांच्याबरोबर चर्चा केली असून या प्रस्तावावर विचार करण्यास सहमती दर्शवली आहे.

राऊतांवर टीका करतांना गुलाबराव पाटलांची जीभ घसरली, एकेरी उल्लेख करत बाप काढला

मुंबईतील नागरिक उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेप्रती सहानुभूती व्यक्त करतात. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद जास्त नाही. आमचे काही आमदार आणि नगरसेवक येथून निवडून येतात. त्यामुळेच आम्ही उद्धव ठाकरेंना प्रस्ताव दिला आहे की मुंबईतील निवडणुका एकत्र लढवू. जर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना मिळून निवडणुकांना सामोरे गेले तर शिवसेनेला फायदा होईल, असे पवार म्हणाले.

नुकत्याच झालेल्या एका सर्व्हेत असे दिसून आले आहे की शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आधिक जागा जिंकेल. मागील वर्षात जे झाले त्यामुळे मुंबईकरांची सहानुभूती निश्चितपणाने शिवसेनेबरोबर आहे. जर आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शिवसनेबरोबरअ असेल तर त्यांनाही याचा फायदा मिळेल, असे पवार म्हणाले.

Chandrasekhar Bawankule : ‘राष्ट्रवादी हा ओबीसी विरोधी पक्ष; त्यांनी ओबीसींचा कसा घात केला हे वडेट्टीवारांना विचारा’

दरम्यान, हा प्रस्ताव अशावेळी आला आहे ज्यावेळी महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्ष जागावाटपाबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी चर्चा करत आहेत. मात्र, याबाबत घटक पक्षांत धुसफूस वाढल्याचेही दिसून आले आहे. आघाडीतील नेते वेगवेगळी वक्तव्ये करत आहेत. त्यामुळे संभ्रम वाढला आहे. जागावाटपाबाबत अद्याप काहीच निश्चित नाही तरी देखील नेतेमंडळी जागांवर दावा ठोकत आहेत. त्यामुळे धुसफूस वाढली आहे. महाविकास आघाडीत तीन पक्ष आहेत. त्यामुळे कुणाला किती जागा द्यायच्या, जागावाटपाचा फॉर्म्युला कसा राहणार यावर अंतिम निर्णय घेताना वरिष्ठ नेत्यांना मोठी कसरत करावी लागणार हे मात्र नक्की.

Exit mobile version