राऊतांवर टीका करतांना गुलाबराव पाटलांची जीभ घसरली, एकेरी उल्लेख करत बाप काढला

राऊतांवर टीका करतांना गुलाबराव पाटलांची जीभ घसरली, एकेरी उल्लेख करत बाप काढला

Gulabrao Patil On Sanjay Raut : ठाकरे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना पत्रकारांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्याबद्दल प्रश्न विचारतात राऊत कॅमेऱ्यासमोर थुंकतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यांच्या या कृतीमुळं चांगलंच राजकारण तापलं होतं. यावर अनेक संमिश्र प्रतिक्रिया आल्या. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही आपली प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर हे प्रकरण काहीसं थंड झालं होतं. मात्र, शिंदे गटाकडून अजूनही यावर प्रतिक्रिया येत आहेत. राऊतांच्या या कृत्याविषयी शिंदे गट चांगलचा आक्रमक झाला. आता शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी राऊतांचा जोरदार समाचार घेतला. (Gulabrao Patil’s tongue slipped while criticizing Sanjay Raut.)

पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ता धरणगाव तालुक्यातील पाळधी येथं काल रात्री आयोजित केलेल्या जाहीर सभेत बोलतांना पाटील म्हणाले की, सध्याचं राजकारण फार गढूळ झालं आहे. आता थुकायला लागतं ते बावळं, असं म्हणत राऊतांवर टीकास्त्र डागलं.

Eknath Shinde : आशियातील सर्वात मोठ्या क्लस्टर योजनेच्या कामाचा मुख्यमंत्र्यांकडून शुभारंभ, म्हणाले…

पाटील म्हणाले की, इतकं घाणेरडं राजकारण मी याकधीही पाहिलं नाही. चाळीस लोकांना संपवून टाकू, चाळीस लोकांना संपवून टाकू, असं राऊत वारंवार सांगत असतात. पण, त्या चाळीस लोकांनी मत दिली राऊत तुला. त्यांच्या मतांच्या जीवावरच तू खासदार झाला आहेस. नाहीतर तू खासदार झाला नसता. तू थुंकतोय काय, तू आधी राजीनामे दे, राऊत म्हणतो, शिवसैनिकांनी मत दिली. हो, तुझा बाप आला होता, मत द्यायला, अशा एकरी शब्दात उल्लेख करत पाटलांनी राऊतांवर टीका केली.

तर दोन दिवसांआधीही पाटील यांनी राऊतांवर टीका केली होती. ज्या आमदारांनी संजय राऊत यांना मतदान करून राज्यसभेवर पाठवले त्यांच्यावरच राऊत टीका करतात. यावरून राऊतांची संस्कृती किती हीन आहे, हे दिसतं. या चाळीस आमदारांसह मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांना मतदान केलं अन् राज्यसभेवर पाठवलं पण, तेच राऊत आज मुख्यमंत्री शिंदे यांच्या मुलाबाबत थंकत आहेत. थोडी जर लाज असले तर राऊतांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा, नालायक लोकांच्या मतांवर खासदार कशाला राहता, असा टोला त्यांनी लगावला होता.

दरम्यान, काल पुन्हा एकदा पाटील यांनी राऊतांचा भर सभेत समाचार घेतला. त्यावर आता संजय राऊत काय प्रतिक्रिया देतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube