Download App

दिशा सालियन प्रकरणात माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग मास्टरमाईंड?, नेमकं काय घडतंय..

अभिनेता सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर असलेल्या दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात (Disha Salian Case) मोठा ट्विस्ट आला आहे.

प्रशांत गोडसे, मुंबई 

Disha Salian Case : अभिनेता सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर असलेल्या दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात (Disha Salian Case) मोठा ट्विस्ट आला आहे. दिशा सालियन यांचे वडील सतीश सालियन यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत मुलीच्या मृत्यूमागे सामूहिक बलात्कार आणि खून असल्याचा गंभीर आरोप केलाय. मुलीच्या संशयास्पद मृत्यूच्या प्रकरणात तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सदर प्रकरणातील तथ्ये लपवल्याचा गंभीर आरोप करत परमबीर सिंग मास्टरमाईंड असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे दिशा सालियन प्रकरणात पोलीस दलातील माजी
पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या नावाचा वारंवार उल्लेख होत असल्यामुळे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग मास्टरमाईंड आहेत की नाही याविषयी चर्चा रंगू लागल्या आहेत.

दिशा सालियन प्रकरणात पत्रकार परिषद घेऊन वडील सतीश सालियन आणि वकील नीलेश ओझा यांनी पत्रकार परिषद घेतली. मुलीच्या संशयास्पद मृत्यूच्या प्रकरणात त्यांनी तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर या प्रकरणातील तथ्ये लपवल्याचा गंभीर आरोप केला होता तसेच तेच मास्टरमाईंड असल्याचे सांगितले होते. मंगळवारी दिशा सालियन प्रकणातील वकील निलेश ओझा यांनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा माजी पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांना सदर प्रकरणातील मास्टरमाईंड असल्याचा आरोप केला आहे.

दिशा सालियान मृत्यू प्रकरण; इमारतीवरून पडली तेव्हा तीच्या अंगावर कपडे…पाहणारे कोण कोण?

परमबीर यांनी सदर प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे नाव येताच कव्हरअप केले. पोलिसांनी दिशाभूल केली. खोटे पुरावे मान्य करायला भाग पाडले आणि तपास योग्य दिशेने होऊ दिला नाही. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सीसीटीव्ही फुटेजमध्ये घटनास्थळी कोणताही राजकारणी आला नसल्याचा दावा केला होता. परंतु मोबाईल टॉवरच्या लोकेशनपासून प्रत्यक्षदर्शींच्या जबाबापर्यंत सर्वच गोष्टी त्यांचा हा दावा खोटा असल्याचे सिद्ध करत आहेत. निलेश ओझा पुढे म्हणाले की, मुंबईच्या दोन माजी सहाय्यक पोलीस आयुक्तांनी त्यांची भेट घेतली आहे. सदर दोन्ही माजी पोलीस आयुक्तांनी आपल्याला दिशा सालियन प्रकरणाशी संबंधित माहिती असलेला पेनड्राईव्ह दिलाय. भेटी दरम्यान दिशा सालियनचे वडील सतीश सालियनदेखील उपस्थित होते.

पेनड्राईव्हमध्ये फोटो, व्हिडीओ रेकॉर्डिंग, स्टिंग ऑपरेशन फुटेज आणि इतर महत्त्वाचे दस्तावेज असल्याच बोलले जात आहे. यात पुरावे मुंबईचे तत्कालीन आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह इतर आरोपींच्या विरोधात असल्याच त्यांनी म्हटले आहे. तसेच सध्या काही व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यात तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या सांगण्यावरून हत्येच्या प्रकरणाला आत्महत्येमध्ये कशा पद्धतीने परावर्तित केले जाते याचे केलेले स्टिंग ऑपरेशन या व्हिडिओतून दाखवण्यात आले आहे. या व्हिडिओची पुष्टी लेट्सअप मराठी करत नाही.

दिशा सालियन प्रकरणात दररोज नवे दावे वकिली निलेश ओझा करत आहेत. त्यामुळे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या विरोधात कोणते पुरावे सादर करतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

दिशा सालियान मृत्यू प्रकरणात नवं वळण; हत्या की आत्महत्या?, मालवणी पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमध्ये काय?

follow us