Aditya Thackeray : पहिल्याच पावसाने मुंबई शहरात पुरती दाणादाण उडाली आहे. अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. पाणी तुंबले गेल्याने मुंबईतील रस्त्यांना नद्यांचे रुप आले आहे. या तुंबलेल्या पाण्यावरून राजकारण जोरात सुरू झाले असून विरोधकांनी सरकारला घेरले आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर हल्लाबोल करत पावसाचे स्वागत करा तक्रार कसली करता असे उत्तर दिले होते. त्यांच्या याच वक्तव्यावर आज आ. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी प्रचंड संताप व्यक्त केला.
Sanjay Raut : ‘वॅग्नर’सारखाच शिंदे गट भाडोत्री, एक दिवस भाजपलाच.. राऊतांचा हल्लाबोल!
आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर जोरदार प्रहार केले. शिंदे यांच्या या वक्तव्यावर ठाकरे म्हणाले, घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांकडून इतका बालिशपणा आम्हाला अपेक्षित नाही. मुंबईत जिथे कधी पाणी तुंबत नाही तिथं पाणी तुंबलं होत. मुख्यमंत्री कुठे होते काय माहित. त्यांचं एक वक्तव्य माझ्या वाचण्यात आलं. पाऊस पडल्याचे स्वागत करा तक्रार काय करता, असे शिंदे म्हणाले. त्यांचे हे विधान म्हणजे हे निर्लज्ज सरकार आहे. इतका निर्लज्जपणा कधी पाहिला नाही, असे ठाकरे म्हणाले.
मुंबईत रस्ते कंत्राटात घोटाळे झाले आहेत. सत्तेवर गद्दार खोके सरकार आहे. यांनी मोठे घोटाळे केले आहेत. मी स्वतः अनेक रस्त्यांचे घोटाळे उजेडात आणले आहेत. सरकारला फक्त कंत्राटदारांची काळजी आहे. मुंबईकरांनी पावसाचे स्वागत केले आहेच. पण यंदा मुंबईत अशा ठिकाणी पाणी तुंबले जिथे याआधी कधीच अशी परिस्थिती निर्माण झाली नव्हती. त्यामुळे एक मुंबईकर म्हणून मुख्यमंत्री शिंदे यांनी जे वक्तव्य केला त्याचा मला राग आहे. त्यांचं वक्तव्य म्हणजे, निर्लज्जपणाचं, नाकर्तेपणाचं आणि भ्रष्टाचाराचा कुठला चेहरा असेल तर हे खोके सरकार आहे.
अंधारेंनी स्वतःला सिद्ध केलं; कायदेंनी फक्त आमदारकी भोगली : खासदार जाधवांचा हल्लाबोल
शिंदेंना लगावला टोला
नंतर जेव्हा केव्हा घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांसाठी वाहतूक थांबविली जाईल तेव्हा हेच मुख्यमंत्री लोकांना म्हणतील अरे ट्राफिकमध्ये अडकल्याची तक्रार काय करता माझे स्वागत करा. मी आलोय, इतका अहंकार मी कधीच पाहिला नाही, असे ठाकरे म्हणाले.