Download App

‘हरी तुला मरू देणार नाही’.. हरी नरकेंच्या आठवणीने भुजबळांना अश्रू अनावर

Mumbai News : ज्येष्ठ विचारवंत, संशोधक, साहित्यिक हरी नरके यांचं चार दिवसांपूर्वी निधन झालं. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या शोकसभेत बोलताना छगन भुजबळ यांना अश्रू अनावर झाले. त्यांच्या आठवणी सांगताना भुजबळांचा कंठ दाटून आला. हरी तुला मरू देणार नाही, असं सांगत नरके यांच्या नावाने भुजबळ नॉलेज सिटीत ग्रंथालय उभारण्याची घोषणा त्यांनी केली. हरी नरके यांच्या नावाने शिष्यवृत्ती देणार असल्याचंही भुजबळ यांनी जाहीर केलं. त्यांची सर्व पुस्तके पुन्हा प्रकाशित करणार असल्याचेही भुजबळ म्हणाले.

ज्येष्ठ विचारवंत प्रा.हरी नरके यांचे ९ ऑगस्ट रोजी निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने भुजबळ नॉलेज सिटी येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या शोकसभेत सामाजिक, साहित्य, सांस्कृतिक, पत्रकारिता, कला आदी क्षेत्र यांसह सर्वपक्षीय राजकीय मान्यवरांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

प्रा. हरी नरके यांच्या निधनाने ओबीसी चळवळीची मोठी हानी : छगन भुजबळ

काय सांगायचं… असं म्हटल्यानंतर भुजबळ काही क्षण थांबले. गहिवरून आल्याने शब्द फुटत नव्हते. तशाच अवस्थेत बोलण्यास सुरुवात केली मात्र अचानक अश्रू अनावर झाले. स्टेजवरच भुजबळ ढसाढसा रडायला लागले. बराच वेळ त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. त्यानंतर स्वतःला सावरत त्यांनी हरी नरकेंच्या आठवणींना उजाळा दिला. भुजबळ पुढे म्हणाले, प्रा.हरी नरके यांची सर्व ग्रंथसंपदा सुमारे २५ हजारांहून अधिक ग्रंथ एकत्र करून मेट भुजबळ नॉलेज सिटी येथे प्रा.हरी नरके यांच्या नावाने ग्रंथालय स्थापन करण्यात येईल. हरी नरके यांच्या नावाने ५ लाख रुपये शिष्यवृत्ती देण्यात येईल अशी घोषणा त्यांनी केली.

 

Tags

follow us