Devendra Fadnavis replies Aditya Thackeray : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसह राज्यातील अन्य महापालिकांच्या निवडणुकांची तयारी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी सुरू केली आहे. या महापालिकांच्या निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात, असे बोलले जात आहे. त्यामुळे ठाकरे गट आणि भाजपात जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू झाल आहेत. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेला फडणवीस यांनी आज उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिले.
‘इतकं क्रूर सरकार अन् राजकारण आम्ही पाहिलं नाही’; मणिपूरवरून राऊतांची पुन्हा आगपाखड
सध्या चांगली कामे सुरू आहेत. त्यामुळे काही जणांच्या पोटात दुखत आहे. पोटात दुखत असल्याने काही लोक रोज पत्र लिहीत आहेत. काँक्रिट रस्त्यांची कामे चालली आहेत. अर्थात चांगली काम चालतात तेव्हा काही लोकांच्या पोटात दुखते, तेव्हा ते रोज एक पत्र लिहीतात. अशाच प्रकारचं एक पत्र त्यांनी स्वतःला 25 वर्ष लिहीलं असतं, तर कदाचित मुंबई अधिक चांगली झाली असती, अशा शब्दांत फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंच्या पत्र प्रपंचाचा समाचार घेतला.
घटनाबाह्य सरकारच्या मुख्यमंत्र्यांना लोकांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यास वेळ नाही. सामान्य मुंबईकर टोल भरतोय पण महामार्गांवर खड्डे कायम आहेत. पश्चिम द्रुतगती आणि पूर्व द्रुतगती मार्गांवर खड्डे पडले आहेत. हे दोन्ही मार्ग बीएमासीकडे दु्रुस्तीसाठी दिले आहेत मग हे टोल का भरायचे. मुंबईकर नागरिक एक कर बीएमसीला देतो मग टोलसाठी दुसरा कर कशाला. जर महामार्गांची देखभाल व्यवस्थित करता येत नसेल तर टोल कशाला घेताय असा सवा आदित्य ठाकरेंनी केला. आमचे सरकार आल्यानंतर आम्ही हे टोल बंद करू असे आश्वासनही त्यांनी दिले होते.