Gajanan Kirtikar replies Pravin Darekar : शिंदे गटाचे नेते गजानन किर्तीकर आणि भाजप आमदार प्रवीण दरेकर यांच्यात चांगलंच वाक् युद्ध रंगलं आहे. ऐन लोकसभेच्या निवडणुकीत ही धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. भाजपचेच नेते कटकारस्थानी आहेत. दुसऱ्यावर आरोप करतात. त्यामुळे त्यांची डोकी तशीच चालतात. कट करणे माझ्या रक्तात नाही. मला ते जमतही नाही. ती सवय भाजपाची आहे, अशा शब्दांत गजानन किर्तीकर यांनी आगपाखड केली.
अमोल किर्तीकरांनी निवडणूक लढणार असल्याचं आधीच जाहीर केलं होतं. परंतु, तो शिंदे गटाकडून लढण्यास इच्छुक नव्हता. माझे वय झाल्याने मी पुन्हा निवडणूक लढण्यास इच्छुक नव्हतो. या निर्णयाची माहिती मी आधीच दिली होती, असा खुलासा गजानन किर्तीकर यांनी केला.
पक्षाचं अस्तित्व टिकवण्यासाठी शरद पवारांची धडपड, प्रविण दरेकरांची टीका…
दरम्यान, याआधी भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी किर्तीकरांवर गंभीर आरोप केले होते. किर्तीकर शिंदे गटा आहेत परंतु, त्यांचा मुलगा उद्धव सेनेत आहे. उत्तर पश्चिम मतदारसंघातून स्वतः उमेदवारी मिळवायची आणि ऐनवेळी अर्ज माघारी घेऊन मुलाला बिनविरोध खासदार करायचं असा कट गजानन किर्तीकरांचा होता, असा आरोप दरेकर यांनी केला होता. वयाने मोठे आणि ज्येष्ठ म्हणून मुख्यमंत्र्यांनी त्यांना मान दिला. पण, किर्तीकरांचा हेतू संशयास्पद होता हे आता हळूहळू बाहेर येत आहे.
यानंतर शिवसेनेचे नेते शिशिर शिंदे यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून किर्तीकरांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. मतदानाच्या दिवशी किर्तीकर मुलगा अमोल किर्तीकर यांच्याच वाहनात होते. त्यांनी अमोलला मदत केली असा आरोप शिशिर शिंदे यांनी केला होता. या पत्राची दखल घेत कारवाई करण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले होते.
‘नेते आयात करुन रिकाम्या जागा भराव्या लागताहेत’; उन्मेश पाटलांवरुन दरेकरांची सडकून टीका