‘नेते आयात करुन रिकाम्या जागा भराव्या लागताहेत’; उन्मेश पाटलांवरुन दरेकरांची सडकून टीका
Pravin Darekar On Udhav Thackeray : उद्धव ठाकरेंना नेते आयात करुन रिकाम्या जागा भराव्या लागत असल्याची सडकून टीका भाजपचे आमदार प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी केली आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपडून राज्यात जोरदार तयारी सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपची प्रचारासाठीची तयारी कशी असणार? याबाबत प्रविण दरेकरांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
धक्कादायक! ICU मध्ये उंदीर चावल्याने रूग्ण दगावला; पुण्यातील ससूनमधील घटना
उन्मेश पाटील ठाकरे गटात जाणार असल्याच्या चर्चांना ऊत आला आहे. जळगावातून ठाकरे गटाकडून उन्मेश पाटील यांनाच उमेदवारी देण्यात येणार असल्याचंही सांगण्यात आहे. त्यासाठी पाटील यांनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याचंही समोर आलं आहे. त्यावर बोलताना दरेकर म्हणाले,
उद्धव ठाकरे यांच्याकडे चांगले नेते नाहीत. जे चांगले नेते होतो ते शिंदे गटात गेले आहेत. त्यामुळे आता निवडणुकीसाठी त्यांना नेते आयात करुन रिकाम्या जागा भराव्या लागत असल्याची टीका दरेकरांनी केलीयं.
ठाकरेंचा एका दगडात दोन ‘पक्षांवर’ निशाणा; उन्मेष पाटील अन् करण पवारांचा भाजपला ‘राम-राम’
काँग्रेसवाले भारत जोडो यात्रा करत आहेत. पण आम्ही लोकं जोडत आहोत. जे आमच्यासोबत येतील त्यांच्याबाबत आमची सकारात्मक भूमिका असेल. महाविकास आघाडी पूर्णपणे विस्कळीत झालीयं. महाविकास आघाडीत एकवाक्यता नाही . ही आघाडी आमच्यासमोर काय लढणार आहे? असा खोचक सवालही प्रविण दरेकर यांनी यावेळी केला आहे.
भावना गवळींच्या उमेदवारीवरुन रणकंदन! ‘…तर सामूहिक राजीनामे देणार’, CM शिंदेंना कडक इशारा
येत्या 6 एप्रिलला केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा विदर्भातून प्रचाराचा नारळ फोडणार असून 10 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली सभा रामटेकमध्ये पार पडणार आहे. त्यानंतर 14 एप्रिलला चंद्रपुरात मोदींची दुसरी सभा होणार असल्याची माहिती भाजपचे नेते प्रविण दरेकर यांनी दिली आहे. प्रविण दरेकर म्हणाले, पतंप्रधान नरेंद्र मोदी यांना सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी भाजपसह एनडीएतील सर्वच पक्षांकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत.
लोकसभा निवडणुकीसाठी प्रचारासह बुध कॅम्पेनिंगच्या सूचना संबंधितांना पक्षाकडून देण्यात आल्या आहेत. येत्या 10 तारखेला पहिला जाहीर सभा रामटेकला होणार असून या सभेला खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित असणार आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी दीक्षाभूमीलाही भेट देणार आहेत. तर 14 एप्रिलला चंद्रपुरात सभा होणार असल्याचं प्रविण दरेकरांनी सांगितलं आहे.