Pravin Darekar: अभिनेता प्रसाद खांडेकरसाठी दरेकर लढले; फडणवीसांकडून थेट कारवाईचा इशारा

Pravin Darekar: अभिनेता प्रसाद खांडेकरसाठी दरेकर लढले; फडणवीसांकडून थेट कारवाईचा इशारा

Pravin Darekar On Prasad Khandekar: हिवाळी अधिवेशनाच्या (Winter session) पहिल्याच दिवशी विधानपरिषदेमध्ये भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी मराठी सिनेमांना थिएटर उपलब्ध होत नसल्याबद्दल प्रश्न उभा केला आहे. हास्य कलाकार दिग्दर्शक अभिनेता प्रसाद खांडेकरच्या (Prasad Khandekar) नवीन मराठी सिनेमाला थिएटर उपलब्ध करून दिलं जात नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितले आहे. मराठी सिनेमाबाबत होणाऱ्या या गळचेपीबद्दल राज्य शासनाने लक्ष घालून सहकार्य करावं अशी थेट मागणी त्यांनी यावेळी केली आहे. या गळचेपीमुळे थेट उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट कारवाईचा इशारा दिला आहे.


विधानपरिषदेमध्ये बोलत असताना आमदार प्रविण दरेकर म्हणाले की, “मागाठाणे विधानसभा क्षेत्रामध्ये राहणारा हास्य कलाकार दिग्दर्शक अभिनेता प्रसाद खांडेकर यांचा उद्या 8 डिसेंबर दिवशी ‘एकदा येऊन तर बघा’ (Ekda Yeun Tar Bagha ) हा मराठी सिनेमा रिलीज होणार आहे. पंरतु हिंदी सिनेमाच्या मनमानीमुळे खांडेकरांच्या सिनेमाला थिएटर मिळत नाही. एक मराठी होतकरू कलाकार-दिग्दर्शक म्हणून पहिल्यांदा मराठी सिनेमा घेऊन आला आहे. परंतु त्याला देखील सिनेमागृह मिळत नसल्याची खंत व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी यामध्ये आवर्जून लक्ष घालून सहकार्य करावं, अशी थेट मागणी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आमदार प्रविण दरेकर यांनी यावेळी केली आहे.

आमदार प्रविण दरेकर यांच्या या प्रश्नावर उत्तर देत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “प्रसाद खांडेकर हे अत्यंत गुणी कलावंत आहे. हास्यजत्रेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षपासून कायम त्यांनी लोकांच्या मनावर राज्य केले आहे. अशा मराठी सिनेमाला थिएटर मिळत नसेल तर थेट कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा दिला आहे.

Khurchi Teaser: ‘तो आलाय सत्तेसाठी…’; अक्षय वाघमारेच्या ‘खुर्ची’चा धमाकेदार टीझर प्रदर्शित

गिरीश कुलकर्णी (Girish Kulkarni), सयाजी शिंदे (Sayaji Shinde), भाऊ कदम (Bhalchandra Kadam), तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit), पॅडी कांबळे, ओंकार भोजने, शशिकांत केरकर, सुशील इनामदार, नम्रता संभेराव (Namrata Sambherao), रसिका वेंगुर्लेकर, वनिता खरात हे कलाकार या सिनेमातून आपल्या पुन्हा एकदा भेटीला येणार आहेत. तसेच ओंकार भोजने आणि प्रसाद खांडेकर त्यांचे भाऊ आणि नम्रता संभेराव सिनेमात तेजस्विनीची बहीण असल्याचे टीझरमधून बघायला मिळत आहे. हे कुटुंबीय मिळून नवंकोरं हॉटेल सुरू करत आहेत. परंतु, नव्या हॉटेलमध्ये नेमक्या कोणत्या पाहुण्याची एन्ट्री होणार आहे, हे प्रेक्षकांना 8 डिसेंबर दिवशी बघायला मिळणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube