भावना गवळींच्या उमेदवारीवरुन रणकंदन! ‘…तर सामूहिक राजीनामे देणार’, CM शिंदेंना कडक इशारा

भावना गवळींच्या उमेदवारीवरुन रणकंदन! ‘…तर सामूहिक राजीनामे देणार’, CM शिंदेंना कडक इशारा

Washim-Yavatmal Loksabha : वाशिम-यवतमाळ लोकसभेवरुन (Washim Yavatmal Loksabha) शिवसेना शिंदे गटात रणकंदन सुरु आहे. आत्तापर्यंत 5 वेळा खासदार असलेल्या भावना गवळी (Bhavana Gawali) यांच्या उमेदवारीवरुन संभ्रम निर्माण झाला आहे. भावना गवळी यांना उद्यापर्यंत उमेदवारी जाहीर न केल्यास शिवसैनिक सामूहिक राजीनामे देणार असल्याचा कडक इशारा जिल्हाप्रमुख महादेव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना दिला आहे.

टायगर श्रॉफने खिलाडीला बनवले एप्रिल ‘फूल’! बडे मियाँसोबत केला असा प्रँक, पाहा व्हिडिओ

वाशिम-यवतमाळ लोकसभा निवडणुकीसाठी अद्याप शिंदे गटाकडून उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. या मतदारसंघाची जागा शिवसेनेकडे आहे. याच मतदारसंघातून भावना गवळी सलग पाचवेळा निवडून आल्या आहेत. मागील २५ वर्षांपासून वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघावर अधिराज्य गाजवणाऱ्या शिवसेनेच्या महिला नेतृत्वावर अन्याय का? असा प्रश्न उपस्थित करीत विरोधकांनी भावना गवळी यांच्या विरोधात खोटे सर्व्हे करून तिकीट कापण्याचे षडयंत्र रचल्याचा आरोप महादेव ठाकरे यांनी केला आहे.

Lok Sabha Election : भुजबळांसाठी हेमंत गोडसेंचा राजकीय बळी महायुतीसाठी आवश्यकच !

आढावा बैठकीदरम्यान शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आक्रमक होत जिल्हाप्रमुखांना उमेदवारीसंदर्भात प्रश्न केले. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी शिवसेना पदाधिकारी यांनी खासदार भावना गवळी यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. यावेळी मुख्यमंत्र्याच्या ‘वर्षा’ या निवासस्थानी पालकमंत्री संजय राठोड यांची देखील उपस्थिती होती. पालकमंत्री संजय राठोड यांनी देखील भावना गवळी यांना समर्थन दिले असून विरोधकांकडून खोटी माहिती पसरवून खच्चीकरण केले जात असल्याचा आरोप केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज