‘मुंबई कोण लुटतंय हे मुंबईकर पाहतोय’; शेलारांची टीकेवर दानवेंचा घणाघात

Ambadas Danve replies Ashish Shelar : मुंबई महापालिकेच्या संदर्भाने उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका करणाऱ्या भाजप नेते अॅड. आशिष शेलार यांना आ. अंबादास दानवे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. महापालिकेच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवत भाजपने रणनितीनुसार ठाकरे गटावर प्रहार सुरू केले आहेत. रोज नवनवीन आरोप केले जात आहेत. त्यावर ठाकरे गटाचे नेतेही तितक्याच तडफेने उत्तर देत आहेत. शेलार […]

Ambadas Danve And Ashish Shelar

Ambadas Danve And Ashish Shelar

Ambadas Danve replies Ashish Shelar : मुंबई महापालिकेच्या संदर्भाने उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका करणाऱ्या भाजप नेते अॅड. आशिष शेलार यांना आ. अंबादास दानवे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. महापालिकेच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवत भाजपने रणनितीनुसार ठाकरे गटावर प्रहार सुरू केले आहेत. रोज नवनवीन आरोप केले जात आहेत. त्यावर ठाकरे गटाचे नेतेही तितक्याच तडफेने उत्तर देत आहेत.

शेलार यांनी केलेल्या ट्विटला दानवे यांनी मुंबई कोण लुटतंय हे मुंबईकर पाहतोय असे म्हणत प्रत्युत्तर दिले आहे. दानवे यांनीही एक ट्विट केलं आहे. “काय तो साक्षात्कार तुमचा! शिवसेना मुंबई महापालिकेच्या सत्तेच्या बाकावर बसलेली असताना तुम्ही आणि तुमचा जगातील सर्वात मोठा पक्ष काय डोळे लावून ध्यान करत होतात का? सत्तेत भागीदारी घेऊन पुन्हा हे बोलण्याचा नैतिक अधिकार तुम्हाला नाही. मुंबई कोण लुटतंय हे मुंबईकर पाहतो आहेच! ज्या प्रकारे मुंबईकरांच्या ठेवी ‘उडवल्या’ जात आहेत त्यावरून मुंबईकरांना काही सांगायची गरज नाही..” अशा शब्दांत दानवेंनी शेलारांना सुनावले.

आशिष शेलार काय म्हणाले होते ?

गेल्या पंचवीस वर्षात मुंबईत रस्त्यावर खड्डे पडले. मुंबईची तुंबई झाली. अनेकजण मॅनहोलमध्य पडून वाहून गेले. 26 जुलैला तर अनेकांची आयुष्यं उद्धवस्त झाली. झाड पडून काहीजण गेले. तेव्हा मुंबईचे हे तथाकथित कारभारी युवराज म्हणाले नव्हते, मुंबईकर हो तुम्हाला सेवा देण्यात कमी पडलो तुम्ही पालिकेला कर देणे बंद करा. आज काय सांगतात, रस्त्यावर खड्डे पडले म्हणून टोल भरू नका. मुंबईकर हो, म्हणून आम्ही वारंवार सांगतोय लबाड लांडगा ढोंग करतोय मुंबईकरांच्या कैवाराचे सोंग करतोय. अशा शब्दांत आमदार शेलार यांनी ठाकरे गटावर टीका केली होती.

Exit mobile version