Mumbai News : राज्यातील विनाअनुदानित शाळांतील अंशतः आणि विनाअनुदानित शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपोषण सुरू केले आहे. राज्यातील जवळपास 70 हजार कर्मचाऱ्यांनी मुंबईतील आझाद मैदानावर जमा होण्यास सुरुवात केली आहे. शंभर टक्के अनुदान मिळण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू करण्यात आले आहे. दोन तीन वर्षांपूर्वीही असे आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी 20 आणि 40 टक्क्यांच्या अनुदानाचा प्रश्न सुटला होता. पण आता पुढील अनुदानाचा टप्पा मिळावा, अनुदान मिळावे या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. सरकारने आता अधिक वेळ न घेता अनुदान मिळण्याबाबत तातडीने शासन निर्णय काढावा अशी मागणी उपोषणकर्त्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केली.
अंशतः अनुदानित शाळांना 15 नोव्हेंबर 2011 आणि 4 जून 2014 जो शासन निर्णय आहे त्यानुसार पहिल्या वर्षी 20 टक्के, दुसऱ्या वर्षी 40 टक्के तिसऱ्या वर्षी 60 टक्के चौथ्या वर्षी 80 टक्के हे जे काही अनुदान वितरणाचे सूत्र आहे हे अनुदानाचे सूत्र लागू करावे. अनुदानाचे निकष पूर्ण करून आम्हाला दहा वर्षे होऊन गेली आहेत त्यामुळे आम्ही सर्वजण अनुदानास पात्र आहोत. त्यामुळे सरकारने आता अनुदान वितरणाचे सूत्र लागू करून शंभर टक्के अनुदान द्यावे.
School Closed in Mumbai : मुंबई अन् उपनगरातील शाळा महाविद्यालयांना उद्या सुट्टी..
आमच्यावर आंदोलनाची वेळ येऊ देऊ नका
राज्यातील 63 हजार शिक्षक कर्मचाऱ्यांशी संबंधित हा मुद्दा आहे. टप्पा अनुदान देण्यासाठी विधिमंडळ सभागृहात अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साडेपाच हजार कोटी रुपये शिक्षकांच्या वेतन अनुदानासाठी पुढील तीन वर्षात खर्च करणार असल्याचे सांगितले होते. याच मैदानावर आधी ज्यावेळी आंदोलन सुरू होतं तेव्हा या शाळांना अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. आमची सरकारला विनंती आहे की सरकारने टप्पा अनुदानाचा जो शब्द निवडणुकीच्या काळात दिला होता तो शब्द आता सरकारने पूर्ण करावा. प्रचलित नियमानुसार अनुदान मिळालं पाहिजे. प्रत्येक वेळी आंदोलन करण्याची वेळ येता कामा नये. हे थांबलं पाहिजे अशा भावना आंदोलनकर्त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
दरम्यान, राज्यातील साडेसहा हजार शाळांमधील ६३ हजार शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विनाअनुदानित, अंशतः अनुदानित शाळांतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. हे शिक्षक मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणासाठी बसले आहेत. याआधी २०% आणि ४०% अनुदान वेतनासाठी दिले आहे त्यात आता वाढ करावी अशी मागणी या शिक्षकांकडून करण्यात आली आहे.
मुंबईतील हिरे उद्योगासह उर्वरित उद्योगही गुजरातला नेण्यासाठी मोदी महाराष्ट्रात; पटोलेंचा घणाघात