Download App

Threat Call : एक-दोन दिवसांत अतिरेकी हल्ला! थेट मंत्रालयात खणखणला धमकीचा फोन

Threat Call : धमक्यांच्या फोनचे सत्र सुरूच आहे. मुंबई लोकलमध्ये साखळी बॉम्बस्फोटांच्या धमकीच्या फोनचे प्रकरण ताजे असतानाच आता मुंबईतील मंत्रालय नियंत्रण कक्षातच धमकीचा फोन आल्याने खळबळ उडाली आहे. येत्या एक ते दोन दिवसात अतिरेकी हल्ल्याची धमकी या फोनद्वारे देण्यात आली आहे. या फोननंतर मुंबई पोलीस पुन्हा अलर्ट झाले आहेत.

मंत्रालयातील नियंत्रण कक्षात हा धमकीचा फोन आला आहे. येत्या एक ते दोन दिवसात हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे. सोमवारी रात्री 10 वाजता मंत्रालय नियंत्रण कक्षात हा फोन आला होता. हा हल्ला कोठे होणार याबाबत मात्र काहीच सांगितलं गेलं नाही. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली गेली. त्यानंतर पोलिसांनीही घटनेची गंभीरता लक्षात घेता लगेच तपास सुरू केला.

धमकीचा कॉल ट्रेस करण्याचे काम सध्या सुरू असून पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. धमकीचा कॉल का करण्यात आला याची कारणे शोधण्याचे काम सुरू आहे.  धमकीच्या फोनमध्ये खरंच काही तथ्य आहे का? याची पडताळणी मुंबई पोलिसांकडून करण्यात येत आहे. याआधी रविवारी मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये साखळी बॉम्बस्फोट करण्याचा धमकीचा फोन आला होता. यानंतर दोन ते अडीच तासांतच पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर आता पुन्हा धमकीचा फोन आला आहे. मागील काही दिवसांपासून राजकीय नेत्यांनाही धमकीचे फोन आले आहेत. त्यामुळे पोलीस यंत्रणेसमोरील आव्हानेही वाढली आहेत.

Tags

follow us