Download App

‘आदित्य ठाकरे बालबुद्धी नाही तर मंदबुद्धी’; शिंदे गटाच्या नेत्याचे सणसणीत उत्तर

Kiran Pawaskar replies Aditya Thackeray : पहिल्याच पावसाने मुंबई शहरात पुरती दाणादाण उडाली आहे. अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. पाणी तुंबले गेल्याने मुंबईतील रस्त्यांना नद्यांचे रुप आले आहे. या तुंबलेल्या पाण्यावरून राजकारण जोरात सुरू झाले असून विरोधकांनी सरकारला घेरले आहे. यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी केलेल्या वक्तव्यावर आज आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी पत्रकार परिषदेत संताप व्यक्त केला. त्यावर शिंदे गटाचे नेते किरण पावसकर (Kiran Pawaskar) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

ते म्हणाले, पाऊस पडला नसता तर ते म्हणाले असते की शिंदे सरकार आहे म्हणूनच पाऊस पडला नाही आणि आता पाऊस पडला तर वाट्टेल ते बोलतात. ते बालबुद्धी नाही तर मंदबुद्धी आहेत. मुख्यमंत्र्यांनी फक्त म्हटलं होतं की पावसाचं स्वागत करा तक्रार नको. स्वागत कशासाठी तर शेतकरी, कष्टकरी वर्ग सुखी होईल. पाऊस पडून अजून 24 तासही उलटले नाहीत तर यांची पत्रकार परिषदेला सुरुवात. त्यात जे काही बोलणं चाललं होतं त्यावरून आदित्य ठाकरेंनी या राज्यातील कष्टकरी, शेतकरी, सर्वसामान्य नागरिक, राजकारणी या सगळ्यांचाच अपमान केला आहे. आजची पत्रकार परिषद ही निव्वळ पोटदुखी होती.

काँग्रेसचं ‘टार्गेट’ सांगत पटोलेंनी कार्यकर्त्यांना दिलं ‘टॉनिक’; मित्रपक्षांनाही दिला इशारा

24 वर्षात तुम्ही जी काही घाण मुंबई महापालिकेत करून ठेवली आहे. कंत्राटदार, दलाल सगळ्यांकडून तुम्ही जे काही पैसे घेऊन ठेवलेत ते दहा अकरा महिन्यात होणार आहे का अकरा महिन्यात तुम्हाला सगळं स्वच्छ पाहिजे आहे का कोणते आरोप तुम्ही करत आहात. अजून कामाला सुरुवात झालेली नाही. टेंडरींग कार्यवाही झालेली नाही. तरी तुम्हाला लगेच भ्रष्टाचार दिसतोय. आदित्य ठाकरे यांनी तर यावर बोलूच नये. तुम्ही जे मोठे झालात ते या कंत्राटादार, दलााल यांच्याकडून जे पैसे घेतले गेले त्यातून मोठे झाले आहात. तुमच्या बालपणाचा खर्चही त्याच पैशांतून झाला आहे, हे विसरू नका अशी घणाघाती टीका पावसकर यांनी केली.

Tags

follow us