Download App

‘फडणवीसांचा नारा अन् सगळे भ्रष्टाचारी झाले शुद्ध’; चक्की पिसिंगच्या घोषणेवरून राऊतांचा खोचक टोला

Sanjay Raut vs Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांनी चक्की पिसिंग, चक्की पिसिंगचा नारा दिला होता. त्यांच्या या नाऱ्यामुळे हे सगळे भ्रष्टाचारी त्यांच्या पक्षात गेले आणि शुद्ध झाले. मधल्या काही काळात मलाही भेटले म्हणाले आता आम्ही तरी काय करणार? नाहीतर आमच्यावर चक्की पिसण्याची वेळ आली असती. आता ते स्वतःचा जीव वाचविण्यासाठी तिकडे गेलेत त्यामुळे योग्य वेळी त्यावर खुलासा करू, अशा शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली.

Pankaja Munde : ‘पंकजांना भाजपमध्ये जास्त त्रास झाला तर’… भाऊ जानकरांचा निर्वाणीचा इशारा

राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधत विविध मुद्द्यांवर मते व्यक्त केली. भाजपाच्या नेतृत्वातील एनडीएही आता विस्तार करण्याच्या प्रयत्नात आहे. याबद्दल विचारले असता राऊत म्हणाले, 2024 मध्ये सत्तेत येण्यासाठीच विरोधी पक्षांची INDIA आघाडी स्थापन झाली आहे. त्यानंतर आता ते लोक एनडीए वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. याआधी एनडीए कुठे होता. अकेले मोदी 400 पार करेंगे असे म्हटले जात होते. आता ही घोषणा कुठे गेली, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.

मणिपूरमधील घटनेवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी संताप व्यक्त नराधमांना फासावर लटकावण्याची मागणी केली. या घटनेनवर केंद्र सरकार काहीच बोलत नाही, हे आणखी चिंताजनक आहे, अशी टीका त्यांनी केली होती. त्यांच्या या टीकेवर राऊत म्हणाले, महाराष्ट्रात ज्यांच्यावर भाजपने पुराव्यांसह भ्रष्टाचाराचे आरोप केले ते सगळं लोक शपथ घेऊन भाजपच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून सहभागी झाले आहेत.

https://letsupp.com/national/bjp-mla-has-alleged-that-prime-minister-narendra-modi-and-home-minister-amit-shah-do-not-have-time-to-listen-to-the-seriousness-of-the-situation-in-manipur-71066.html

अण्णा हजारे यांनी आधी यावर आवाज उठवायला हवा. अजित पवार असतील, हसन मुश्रीफ असतील किंवा शिवसेनेतून बेईमानी करून जे गेले आणि आता मंत्री असतील या सगळ्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत. अण्णा हजारेंनी या विषयावर भूमिका व्यक्त करुन एका आंदोलनाची घोषणा केली पाहिजे आम्ही सगळे त्यांच्याबरोबर आहोत.

Tags

follow us