Sanjay Raut : काल ठाण्यात दोन वेगवेगळ्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर सडकन टीका केली. त्यांच्या या टीकेला आज खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेतून जोरदार प्रत्युत्तर दिले. राऊत यांन शिंदे आणि फडणवीस यांचा चांगलाच समाचार घेतला.
ते म्हणाले, ठाणे जिल्ह्यात काल बाजूबाजूला दोन हास्यजत्रेचे शो पार पडले. फडणवीस म्हणतात आम्ही राष्ट्रवादी बरोबर गेलो ही कुटनिती आहे म्हणजेच राजकारण आहे. मग आम्ही जे राष्ट्रवादीबरोबर गेलो ते काय होतं?. तुम्ही करता ती कुटनिती, विदुरनिती, चाणक्यनिती. मग, ज्यावेळी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येतात ते काय होतं?, याचं उत्तर फडणवीस यांनी राज्यातील जनतेला द्यावे. वैफल्यग्रस्त अवस्थेत चुकीची विधान करू नका तुमचं हसं होत आहे.
शासन तुमच्या दारी हे घरी बसणाऱ्यांना कसं कळेल? CM शिंदेचा ठाकरेंना खोचक टोला
2019 मध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले ती या राज्याची गरज होती. कुटनिती होती. तुमच्यासारख्या खोटारड्या लोकांना दूर ठेवण्यासाठी ती कुटनिती होती, असा पलटवार राऊत यांनी केला.
दुसऱ्या फु बाई फु कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला की राष्ट्रवादीबरोबर आपण जे गेलो ते बेरजेचं राजकारण आहे. मग, शिवसेना राष्ट्रवादीबरोबर गेली ते कोणतं राजकारण होतं. त्या बेरजेच्या राजकारणाच तुम्ही अडीच वर्षे सत्ता भोगली. अशा तऱ्हेने राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी काल पुन्हा एकदा आपण किती खोटारडे आहोत. फसवणूक करत आहोत लोकांची. काल काय बोललो आज काय बोलतोय याचे काहीच भान नाही, कोणत्या नशेमध्ये आहात. यांना कोणती भांग कुणी पाजली आहे हेच कळत नाही, असे राऊत म्हणाले.
Saamana On PM Modi : राज्य पेटवून मजा बघायचे हे निर्घृण हुकूमशहालाच जमू शकते…
फडणवीस खोटं बोलताहेत, शिंदे-मिंधे खोटं बोलताहेत अजितदादांना अजून कंठ फुटायचा आहे. तेव्हा आम्ही बोलूच. पण, शिवसेना आणि महाराष्ट्राच्या बाबतीत ते अत्यंत खोटं बोलत आहेत. तुम्ही केली ती कुटनिती आणि शिवसेनेने केला तो विश्वासघात. खरं म्हणजे शिंदे आणि फडणवीस यांनी केलेला विश्वासघात महाराष्ट्रच्या काळजात आरपार घुसला आहे. तुमच्या या फालतु कुटनितीमुळे जनता तुम्हाला कुटून खाणार आहे. तुमच्यासारख्या बेईमान लोकांना दूर ठेवण्यासाठीच महाविकास आघाडी स्थापन केली ती सुद्धा कुटनितीच होती, असे राऊत यांनी ठणकावून सांगितले.