शासन तुमच्या दारी हे घरी बसणाऱ्यांना कसं कळेल? CM शिंदेचा ठाकरेंना खोचक टोला

शासन तुमच्या दारी हे घरी बसणाऱ्यांना कसं कळेल? CM शिंदेचा ठाकरेंना खोचक टोला

Eknath Shinde : राज्य शासनाचा ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाचे अनेक जिल्ह्यांत आयोजन केल्या जातं. दरम्यान, विदर्भ दौऱ्यात शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis) सरकारवर याच योजनेवरून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी हल्लाबोल केला होता. नुसतं दारी जाऊन काही उपयोग नाही. तर योजना त्यांच्या घरी पोहोचल्या का? हे पाहिलं पाहिजे, अशी टीका केली होती. त्यांच्या याच टीकेला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. (Eknath Shinde attack on Uddhav Thackeray shivsena melava thane)

शासन तुमच्या दारी हे घरी बसणाऱ्यांना कसं कळेल, अडीच वर्ष सत्ता असतांना हे बाहेरही पडले नाही आणि कोणती योजना राबवली नाही. अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचा जोरदार समाचार घेतला. आज ठाण्यात शिवसेनेचा मेळावा झाला. या सभेत एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. यावेळी बोलतांना ते म्हणाले, लोक सत्तेत जातात पण मंत्रिपदावर असलेले लोक एकनाथ शिंदेंसोबत पायउतार झाले. मला कोणी विचारले नाही. सत्तेत बाहेर पडल्यावर का काय होईल, कसे होईल? जगाच्या इतिहासात असं उदाहरण कुठंही सापडणार नाही की जे लोक सत्तेत होते, मंत्रिपदावर होते त्यांनी राजीनामे दिले. सत्तेतून बाहेर पडतांना काय होणार, हे देखील माहित नव्हते. पण आम्ही लढायचे ठरवलं. एकतर लढू किंवा शहीद होऊ, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

उद्धव ठाकरे तुम्ही तर महाकलंक, फडणवीसांची बाजू घेत शिंदेचा हल्लाबोल 

ते म्हणाले, महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये असतांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अभिनंदनाचा ठराव आपण तेव्हा घेऊ शकलो नाही आणि कलम ३७० हटवल्यानंतरही आपण उत्सव साजरा करू शकलो नाही. मग आपण निर्णय घेतला. आणि सत्तेतून बाहेर पडलो. सत्तेतून बाहेर पडणार आपण जगातील एकमेव आहोत. हा आम्ही घेतलेला निर्णय सर्वसामान्यांच्या हितासाठी घेतला. स्वत:च्या स्वार्थासाठी नाही घेतला, असं मुख्यमंत्री म्हणाले.

महाविकास आघाडीत असतांना आपल्या डोळ्यादेखत शिवसैनिकांच खच्चीकरण होत होतं. अनेक गुन्हे लादले जात होते. मोक्कासारख्या कारवाया तरुणांवर होत होत्या. मग ती सत्ता काय कामाची? त्यामुळं बाहेर पडलो. आता शिवसैनिकांच्या केसालाही धक्का लागणार नाही, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली.

ते म्हणाले, सत्ता येते आणि जाते. पण सत्ता नसतानाही लोक तुमच्यासाठी थांबले पाहिजेत. प्रत्येकजण स्वतःसाठी जगतो. पण, खरा माणूस तोच असतो जो इतरांचे दुःख कमी करण्यासाठी झटतो. माणूस त्याच्या कर्माने मोठा असतो. पण बाळासाहेबांच्या सत्तेसाठी विचारांचा पायदळी तुडवलं. ज्यांना बाळासाहेबांनी दूर ठेवले होते, त्यांच्यासोबत जाऊन तुम्ही सत्तेत सहभागी आलात. आता बोलायला लागलो तर पळता भुई थोडी होईल, असाही इशारा त्यांनी दिला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube