मुंबई : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम विनोदी अभिनेते प्रभाकर मोरे ( prabhakar more) यांनी आता राजकारणात एन्ट्री घेतली. प्रभाकर मोरे यांनी मनगटावर घड्याळ बांधत राष्ट्रवादीत (NCP ) प्रवेश केला. विनोदी कार्यक्रमात खळखळून हसवणारे अभिनेते अशी त्यांची ओळख त्यांची आहे. काही दिवसांपासून ते राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण येत होते. अखेर आता त्यांनी त्यांच्या पक्षप्रवेशाची घोषणा करण्यात आली आहे.
प्रभाकर मोरे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मुंबईत राष्ट्रवादीच्या कार्यालयात हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी अजित पवारांनी प्रभाकर मोरे यांना काही मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या. यावेळी त्यांना कोकण विभागाची अध्यक्षपद आणि चित्रपट सांस्कृतिक विभागाची जबाबदारी देण्यात आली.
यावेळी प्रभाकर मोरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, कलाकारांच्या व्यथा मांडण्याकरिता आणि कोकणातील कला संस्कृतीत काही अडचणी आहेत. त्यामध्ये मदत करण्यासाठी, व्यवस्थित मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. अजित पवार यांच्या स्वभावामुळे मी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत आहे.