Download App

कबुतरांना दाणे टाकायचे असतील तर घराच्या टेरेसवर टाका; मनिषा कायंदेंनी आंदोलकांना ठणकावलं

मुंबईत कबुतरखान्यांचा विषय न्यायप्रविष्ट असताना अशा प्रकारे उद्रेक करणं कोणत्या कायद्यात बसते, असा सवाल कायंदे यांनी केला

  • Written By: Last Updated:

Manisha Kayande On Kabutar Khana : मुंबई महानगरपालिकेनं (Mumbai Municipal Corporation) ताडपत्री टाकून दादर कबुतरखाना (Kabutar Khana Dadar) बंद केला. त्याविरोधात आज (६ ऑगस्ट) दादर कबुतरखाना परिसरात जैन समाजानं मोठं आंदोलन केलं. आंदोलकांनी ताडपत्री फाडून टाकली आणि कबुतरखाना पुन्हा सुरू केला. यावर मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी जे काही झाले ते बाहेरील लोकांनी केलंय, असं म्हटलं. तर आमदार मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी हे सर्व प्री प्लॅन होतं. आंदोलनकर्ते जैन समुदायाचे लोक होते, असं म्हटलं.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात, विजय वडेट्टीवारांची मागणी 

मनिषा कायंदे यांनी एका वृत्त वाहिनीशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, दादर कबुतरखान्याबाहेर जैन समाजाने हातात हत्यारं घेऊन ताडपत्री फाडून टाकली. जैन समाजाचं हे आंदोलन टोकाचा आणि अतिरेकी विचार आहे, मुंबईत कबुतरखान्यांचा विषय न्यायप्रविष्ट असताना अशा प्रकारे उद्रेक करणं कोणत्या कायद्यात बसते, असा सवाल कायंदे यांनी केला. हा कोर्टाचा विषय आहे, हा धार्मिक विषय नाही, त्यामुळं जैन समाजाने अतिरेकीपणा करू नये, असं कायंदेंनी म्हटलं.

पुढं त्या म्हणाल्या, कोणीही उठून कबुतरांना दाणे टाकते. कालही अनेकांनी पाच किलो धान्य फूटपाथवर ओतलं होतं. किराणा दुकानातून दाणे घ्यायये आणि रस्त्यावर टाकायचे. लोकांना चालण्यासाठीचे फुटपाथ त्यासाठी ठेवले आहेत का? कबुतरांमुळे होणारा त्रास हा वैज्ञानिक विषय आहे, त्यात धर्म आणू नये. कबुतर फक्त दाणे खात नाहीत, कीटकही खातात. निसर्गाने कबुतरांना पंख दिले आहेत. ते त्यांचं खाद्य शोधतात. तुम्ही त्यांना सवय लावली आहे, तुम्ही दाणे टाकता म्हणून ते तिथं येतात. तुम्ही दुसरीकडे कुठेतरी दाणे टाका, कबुतरं तिकडे येतील, असंही कायदे म्हणाल्या.

ही आरपारची लढाई, सरकारने त्यांची माणसं आंदोलनात घुसवली तर… जरांगेंचा इशारा 

तुम्हाला कबुतरांना दाणे टाकायचे असतील तर तुमच्या इमारतीच्या छतावर टाका, तुमच्या मंदिरांना का जाळ्या लावल्या आहेत? असा सवालही कायंदेंनी केला.

मुंबईतील ५१ ठिकाणी कबुतरखाने कोणी सुरू केले? उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या पान क्रमांक सहावर लिहिलंय की, या जागा पाणपोई होत्या. लोकांनी तिकडे दाणे टाकून त्याचे कबुतरखाने केले, असंही कायंदे यांनी म्हटलं. तसेच कबुतरांच्या विष्ठेतून निर्माण होणाऱ्या फंगसमुळे अनेक लोक मरतात. त्यांच्या मृत्यूला कोण जबाबदार ? जे लोक मेलेत या आजारामुळे त्यांच्याबद्दल काय म्हणणं आहे? आजारी पडलेल्या लोकांनीही आता मोर्चा काढायचा का? असा सवाल कायंदे यांनी केला.

 

 

follow us