ही आरपारची लढाई, सरकारने त्यांची माणसं आंदोलनात घुसवली तर… जरांगेंचा इशारा

If the government forces its people into the movement… Jarange outlined of the Mumbai Morcha : गेल्या दोन वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी आता पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मराठा आंदोलकांसह ते मुंबईत जाणार असल्याचं सांगितलं. तसेच यावेळी त्यांनी हा मोर्चा कसा असणार हे देखील सांगितले आहे.
काय म्हणाले मनोज जरांगे?
आम्ही नवीन मोहीम राबवली. सभा घेतल्यानंतर बांधवांची चर्चा करतो आहे. धाराशिवपासून पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सुरू केला आहे. सोलापूरनंतर सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे आणि अहिल्यानगर दौरा असणार. हा दौरा झाल्यानंतर मराठा बांधवांची चर्चा करून 29 ऑगस्ट रोजी मुंबईला सर्वांनी निघायचे आहे.
कोथरुड प्रकरणात मोठा ट्विस्ट! तरूणींना मारहाण झालीच नाही? ‘ससून’चा अहवाल पोलिसांच्या बाजूने
ज्याची नोंद निघाली, त्यांनी गाडी घेऊन मुंबईकडे निघायचे, एक घर, एक गाडी निघणार हा नारा सोलापुरातून देतो. मीडियाच्या बांधवांची खोटं बोलून जमत नाही, ते चिरफाड करतात. सोलापुरात दोन तासापासून बैठका सुरू होत्या. प्रत्येकाने आपली वाहन घेऊन निघायचे. एकदम सोपी मोहीम आहे. एक घर, एक गाडी घेऊन निघायचे. सोलापूरच्या युवकांना आव्हान करतो, आरपारची लढाई आहे. रेकॉर्ड ब्रेक सभा होणार. असा समुद्र मराठ्यांना कधीच बघायला मिळणार नाही. या लढाईचे तुम्ही साक्षीदार व्हा.
29 ऑगस्टची अंतिम लढाई असणार आहे. मुंबई जाताना शांततेत जायचे आणि शांततेत यायचे आहे. विजय मिळवल्याशिवाय परत यायचे नाही.
सरकारने जर आपली माणस आंदोलनात घुसवले, तर एक इंचही मागे सरायचे नाही. मराठ्यांनी कुठेही जाळपोळ, दगडफेक करायची नाही.
मुंबईकडे जाण्यासाठी 5 हजार पाण्याचे टँकर लागणार. मराठ्यांच्या डोक्यावरती आरक्षणाचा गुलाल टाकायचा म्हणजे टाकायचा. अंतरवाली सराटी येथून सकाळी 10 वाजता आम्ही निघणार. शिवनेरीचा पहिला मुक्काम करावा लागेल, आपले फक्त 15 किलोमीटरचे अंतर आहे. शिवनेरी वरून चाकण, राजगुरुनगर, लोणावळा, आझाद मैदान मार्गे जावे लागेल. यात जर मुलांचे हाल होत असेल, तर मार्ग बदलावा लागेल.
उद्धव ठाकरे अन् एकनाथ शिंदे एकाच दिवशी दिल्ली दौऱ्यावर; टायमिंग अन् नव्या समिकरणाची चर्चा
जोपर्यंत सरकारकडून कुणबी आणि मराठा हा अध्यादेश येत नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. सरकारकडे 58 लाख कुणबी असल्याच्या नोंदी आहेत. त्यामुळे त्यांना कायदा पारित करावा लागेल. आता तुम्हाला मराठा आणि कुणबी एक आहेत, असा GR काढायला काही हरकत नाही. हैद्राबाद गॅजेट, सातारा संस्थान गॅजेट, बॉम्बे अनुसंस्था गॅझेट हे आम्ही घेणार आहोत. कारण पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण बसू शकतो. राज्यातले सरसकट गुन्हे मागे घेण्याचा आदेश सरकारने त्यावेळी केला होता.
60 लाखांचा फ्लॅट पण, पिण्याच्या पाण्याची बोंब; वाघोलीतील गार्डियन बिल्डरविरूद्ध रहिवाशांचा शड्डू
मराठा आरक्षणासाठी जीव दिलेल्या लोकांच्या आर्थिकतेचा विचार केला जावा. अशा अनेक मागण्या आहेत. जोपर्यंत या मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही. गेल्यावेळी आमची फसवणूक झाली, यावेळी आम्ही माघार घेणार नाही. काही वेळा कधी कधी चार पावले माघारी घ्याव लागतं. मला व माझ्या समाजाला कोणी आडमूठ म्हणू नये, म्हणून आम्ही सरकारला वर्षाचा वेळ दिला आहे. एवढा वेळ देशात कोणीही दिला नाही. 6 महिन्यात सगे सोयऱ्याची अधिसूचना काढण्याची ग्वाही दिली होती. तिथे आमची फसवणूक झाली, आमची मागणी ओबीसी आरक्षणाची आहे.