Maratha Reservation Protest : वाशीत साऊंड सिस्टिमने लावला जरांगेंच्या आवाजाला ‘ब्रेक’

नवी मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवाली सराटीतून निघालेला मनोज जरांगेंचा (Manoj Jarange) मोर्चा मुंबईच्या वेशीवर जाऊन धडकला आहे. वाशीमध्ये सरकराच्या शिष्टमंडळासोबत जरांगेंनी प्रदीर्घ चर्चा केली. त्यानंतर ते आंदोलकांना संबोधित करण्यासाठी ते दाखल झाले होते. मात्र, उपस्थित शेवटच्या आंदोलकांपर्यंत आवाज जात नसल्याने आता नव्याने साऊंड सिस्टिमची सोय केली जाणार आहे. त्यानंतर दोन वाजता जरांगे पाटील […]

Maratha Reservation Protest : वाशीत साऊंड सिस्टिमने लावला जरांगेंच्या आवाजाला 'ब्रेक'

Letsupp Image 2024 01 26T133031.693

नवी मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवाली सराटीतून निघालेला मनोज जरांगेंचा (Manoj Jarange) मोर्चा मुंबईच्या वेशीवर जाऊन धडकला आहे. वाशीमध्ये सरकराच्या शिष्टमंडळासोबत जरांगेंनी प्रदीर्घ चर्चा केली. त्यानंतर ते आंदोलकांना संबोधित करण्यासाठी ते दाखल झाले होते. मात्र, उपस्थित शेवटच्या आंदोलकांपर्यंत आवाज जात नसल्याने आता नव्याने साऊंड सिस्टिमची सोय केली जाणार आहे. त्यानंतर दोन वाजता जरांगे पाटील समाज बांधवांशी चर्चा करून भूमिका जाहीर करणार आहेत. सभेला संबोधित करण्यापूर्वी सरकारने आपल्याला काही महत्त्वाची कागदपत्रे दिली असून त्यावर आपल्याला चर्चा करायची असल्याचे जरांगे म्हणाले. मात्र, त्याआधीच साऊंड सिस्टिमने जरांगेच्या आवाजाला ब्रेक लावला. आता नव्याने साऊंड सिस्टिमची सोय केली जाणार आहे. त्यानंतर जरांगे दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास मराठा समाजाशी संवाद साधरणार आहेत. (Manoj Jarange Patil Morchya Update)

Manoj Jarange : आझाद मैदानात घुमणार मराठ्यांचा ‘आव्वाज’; रोहित पवारही मदतीसाठी सरसावले

पुण्यातून लोणावळामार्गे नवी मुंबईतील वेशीवर दाखल झालेला मराठा समाजाचा मोर्चा (Maratha Reservation) काल (दि.25) वाशीत मुक्कामी होता. त्यानंतर आज सकाळी हे आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी सरकारीचे शिष्टमंडळाने जरांगेंशी चर्चा केली. तसेच सरकारी पातळावर काय काय उपाययोजना करण्यात आली आहे त्याबाबत माहिती दिली. शिष्टमंडळासोबत जरांगेंची सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.

Ajit Pawar : पार्थ, गजा मारणे भेट चुकीचीच; अजितदादा करणार कानउघडणी

मात्र, यापूर्वी जसे जरांगेंनी मी कुठलाही निर्णय एकट्याने घेत नसल्याचे जाहीर केले होते. त्याप्रमाणे शिष्टमंडळासोबतच्या चर्चेनंतर जरांगे मराठा समाजातील आंदोलकांसमोर मांडण्यासाठी दाखल झाले होते. मात्र, साऊंड सिस्टिमचा आवाज शेवटच्या आंदोलकांपर्यंत जाऊ शकत नव्हता. त्यामुळे थोडीशी गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. यावर तोडगा काढण्यासाठी म्हणून अखेर नव्याने साऊंड सिस्टिम उभी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी साधारण तासभर लागण्याची शक्यता असून, शिष्टमंडळाने दिलेली माहिती जरांगे 2 वाजता जाहीरपणे वाचून दाखवणार आहेत.

सर्व्हेचं नाटकच, सरकार क्रूर पद्धतीने खेळतंय; ‘तो’ व्हिडिओ शेअर करत आव्हाडांचा घणाघात

राज्य सरकारने काढले 5 ते 6 अध्यादेश

दुसरीकडे जरांगे पाटलांचे आंदोलन मुंबईतील आझाद मैदानापर्यंत पोहचू नये यासाठी सरकारी पातळीवर जोरदार प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच भाग म्हणून जरांगेंच्या मागण्यांच्या विचार करून राज्य सरकारकडून पाच ते सहा अध्यादेश काढले असल्याचे सांगितले जात आहे. आता यात नेमक्या कोणत्या गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. सरकारने अध्यादेशात नमुद केलेल्या बाबी जरांगे पाटील मान्य करतात की आंदोलनासाठी आझाद मैदानाकडे कूच करतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version