Shubankar Tawde : वेगवेगळ्या माध्यमातून कायम प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा तरुण अभिनेता म्हणजे शुभंकर तावडे. 2024 वर्षात शुभंकरने अनेक गोष्टी केल्या आणि हे वर्ष त्याचासाठी चांगलं ठरलं. वर्षाची सुरुवात शुभंकरने चित्रपटाने केली तर वर्षाचा शेवट त्याने नाटकाने केला आहे. 2024 मध्ये शुभंकरने वैविध्यपूर्ण आणि लक्षवेधी भूमिका साकारल्या पण त्याच्या ‘फॅशन गेम’मुळे सुद्धा तो चर्चेत राहिला. चित्रपटाचे ट्रेलर लाँच असो किंवा कामाचा भाग म्हणून केलेलं फोटोशूट असो शुभंकरने या वर्षात फॅशनमध्ये देखील तितकेच प्रयोग केले.
कायम वेगळ्या धाटणीच्या भूमिका असलेले चित्रपट करणारा शुभंकर लाईक आणि सबस्क्राईब, कन्नी आणि 8 दोन 75 या चित्रपटाचा महत्त्वपूर्ण भाग झाला. तिन्ही चित्रपट वेगवेगळ्या विषयांवर असले तरी शुभंकरची प्रत्येक भूमिका तेवढीच लक्षवेधी ठरली.
कलाकार म्हणून त्याने वर्षभर प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आणि वैयक्तिक आयुष्यात देखील एक लाख मोलाचा पल्ला गाठणारी गोष्ट त्याने या वर्षात केली. शुभंकरने वाढदिवसाच्या दिवशी नवी कार घेतली आणि तिचं नाव देखील तितकच खास ठेवलं. लक्ष्मी असं या नव्या गाडीचं नाव असून या मागची खास गोष्ट त्याने सोशल मीडियावर लिहिली होती.
धसांचं विधान अन् प्राजक्ता माळीचं नाव; तक्रारीच्या चर्चांमध्ये चाकणकरांनी दिली मोठी अपडेट
2024 बद्दल बोलताना शुभंकर सांगतो “हे वर्ष माझ्यासाठी खरंच खूप भावनिक ठरलं. अनेक चढउतार सोबतीला घेऊन या वर्षाला निरोप देतोय. या सगळ्या चढउतारात घरचे, मित्रमंडळी अगदी हक्काने माझ्या पाठीमागे उभे होते. 2024 वर्षाला निरोप देताना सगळ्यांना मनापासून थँक्स बोलावंसं वाटतं येणार वर्ष खूप हेल्दी, स्ट्राँग आणि भरपूर काम घेऊन येऊ दे ही आशा करतो ”
वर्ष संपताना शुभंकरने त्याचा आवडत्या कलाकार मंडळींसोबत “विषामृत” नावाचं नाटक देखील केलं. तरुण पिढीचं प्रतिनिधित्व करणार हे नाटक सध्या रंगभूमीवर प्रेक्षकांचं प्रेम मिळवत आहे. तरुणांचे प्रश्न, नातेसंबंधांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन, तरुणांचं भावविश्व या नाटकांमधून उलगडतंय. शुभंकरने या नाटकात मुख्य भूमिका साकारली असून पुन्हा एकदा शुभंकरने तरुणाईला त्याच्या प्रेमात पडायला भाग पाडलं आहे. आता आगामी नवीन वर्षात शुभंकर अजून कोणकोणत्या नव्या प्रोजेक्टचा भाग होणार आहे हे बघण उत्सुकतेच ठरणार आहे.
राजेश खन्ना यांची अजरामर कलाकृती ‘आनंद’ मराठीत; चित्रपटाची रविवारी घोषणा