Download App

पर्ण बनली रुबिना! ‘जिलबी’ चित्रपटात साकारली आव्हानात्मक भूमिका..

आनंद पंडित मोशन पिक्चर्स निर्मित ‘जिलबी’ चित्रपट १७ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Marathi Movie : मालिका, नाटक चित्रपटांतून घराघरांत पोहचलेली अभिनेत्री पर्ण पेठे आता ‘जिलबी’ चित्रपटात एका वेगळ्या व्यक्तिरेखेत दिसणार आहे. पर्णने आजवर साकारलेल्या व्यक्तिरेखांपेक्षा ‘जिलबी’ चित्रपटातील रुबीना ही एका मुस्लीम मुलीची भूमिका खूप वेगळी आहे. रुबिना अत्यंत कणखर आणि धाडसी मुलगी आहे. आनंद पंडित मोशन पिक्चर्स निर्मित ‘जिलबी’ चित्रपट १७ जानेवारीला आपल्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन नितीन कांबळे यांनी केले आहे.

अभिनेता स्वप्नील जोशी, प्रसाद ओक, शिवानी सुर्वे गणेश यादव, प्रणव रावराणे, अश्विनी चावरे, प्रियांका भट्टाचार्य या कलाकारांच्या भूमिका ‘जिलबी’ चित्रपटात आहेत. या भूमिकेसाठी तिचा लूक वैशिष्ट्यपूर्ण आहे. आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना पर्ण सांगते, ‘मी खूप काही ठरवून असं करत नाही. कथेमध्ये भूमिकेत काही वेगळेपण असेल तर ते करायला आवडतं’. चांगल्या विषयामुळे मी या चित्रपटाला होकार दिला.

प्रसाद ओकच्या केसची धुरा सांभाळणार स्वप्नील जोशी, जिलबी चित्रपटाचा दमदार टिझर प्रदर्शित

माझ्या वेगवेगळ्या भूमिकांना प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला असून ‘जिलबी’ चित्रपटातील माझ्या या भूमिकेचं प्रेक्षक नक्कीच स्वागत करतील, असा विश्वास आहे. इतर चित्रपटांच्या तुलनेत मराठीमध्ये सस्पेन्स थ्रीलरपटांची संख्या फार कमी असून, ‘जिलबी’ हा चित्रपट त्यांची उणीव नक्की भरून काढणारा असेल, असे पर्ण सांगते.

‘जिलबी’ चित्रपटाची कथा-पटकथा-संवाद मच्छिंद्र बुगडे यांचे आहेत. आनंद पंडित आणि रूपा पंडित हे निर्माते आहेत. क्रिएटिव्ह दिग्दर्शन आणि सहनिर्मितीची जबाबदारी राहुल व्ही. दुबे यांनी सांभाळली आहे. छायांकन गणेश उतेकर तर कलादिग्दर्शन कौशल सिंग यांचे आहे. कार्यकारी निर्माते महेश चाबुकस्वार आहेत. आनंद पंडित मोशन पिक्चर्स यांनी अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेन्मेन्ट प्रा.लिमिटेड यांच्या सहयोगाने आणलेला ‘जिलबी’ चित्रपट 17 जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) आणि प्रसाद ओक या दोन आघाडीच्या कलाकारांनी एकत्र सिनेमात दिसावं असं त्यांच्या चाहत्यांना नेहमी वाटत असतं, ‘जिलबी’च्या निमित्ताने या दोन अष्टपैलू कलाकारांना एकत्र बघण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. आनंद पंडित मोशन पिक्चर्स निर्मित ही खुमासदार ‘जिलबी’ 17 जानेवारीला आपल्या मनोरंजनासाठी सज्ज झाली आहे.

स्वप्निलसाठी २०२४ लकी! निर्मिती विश्वात पदार्पण ते नव्या चित्रपटांचं गिफ्ट; ‘या’ गोष्टी ठरल्या खास

follow us