Marine Department Exam : मागील काही दिवसांपासून स्पर्धा परिक्षांमध्ये गैरप्रकार सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. तलाठी परीक्षेपासून ते राज्य सेवा परीक्षेपर्यंत पेपर रॅकेट कार्यरत असून काही लाखांमध्ये पेपर मिळवून ते सोडवले जात असल्याची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. अशात आता मुंबईत केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या मरिन इंजिनिअरिंग ऑफिसर परीक्षेत घोटाळा झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
अखेर शरद पवारांना पुण्यासाठी जिल्हाध्यक्ष मिळाला; अडचणीच्या काळात जुन्या सहकाऱ्यावर ‘विश्वास’
उमेदवाराने एका नामंकित हॉटेलमध्ये बसून परीक्षा देत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या उमेदवाराला कंत्राटी कर्मचाऱ्यांनी साडेआठ रुपयांना उत्तरपत्रिका विकली असल्याचंही उघड झालं आहे. दरम्यान, या प्रकरणी मरिन इंजिनिअरिंग विभागाकडून पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Selling Scrap : रद्दी, भंगार विकून केंद्र सरकार मालामाल, कमावले 600 कोटी
केंद्राच्या अखत्यारीत असलेल्या मरिन इंजिनिअरिंग ऑफिसर पदासाठी आज परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी आलेल्या उमेदवारांना परीक्षा केंद्रावरील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी साडेआठ रुपयांना उत्तरपत्रिका देण्याचा प्रकार सुरु असल्याचं पुढे आलयं. उत्तरपत्रिका मिळाल्यानंतर संबंधित उमेदवार परीक्षा केंद्रापासून जवळच असलेल्या एका नामंकित हॉटेलमधून परीक्षा देत होता.
Amitabh and Shahrukh : चित्रपट नाही ‘या’ कारणासाठी एकत्र आले बिग बी अन् किंग खान
या प्रकराबद्दल मरिन विभागाच्या कर्मचाऱ्यांना संशय आल्यानंतर सदरील प्रकार अधिकाऱ्यांनीच समोर आणला आहे. मरीन इंजिनिअरिंग ऑफिसर पदासाठी अनेक उमेदवार परीक्षेसाठी आले होते. त्यांच्यापैकी 22 जणांना उत्तरपत्रिका देण्यात आल्याचं समजतंय. यासाठी परीक्षा केंद्रावर कर्तव्यावर असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी उमेदवारांकडून प्रत्येकी साडेआठ लाख रुपये घेतले आहेत.
दरम्यान, या प्रकाराबद्दल माहिती समजताच मरिन इंजिनिअरिंग विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून 22 जणांविरोधात परीक्षेत घोटाळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून अधिक तपास सुरु करण्यात आला आहे.