Download App

Mhada Lottery 2023 : सामान्यांचं स्वप्न अखेर पूर्ण होणार; म्हाडाच्या मुंबईतील 4083 घरांसाठी आज सोडत!

Mhada Lottery 2023 : मुंबईमध्ये घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्या सामान्य नागरिकाचं स्वप्न आज अखेर पूर्ण हेणार आहे. कारण आज 14 ऑगस्ट म्हाडाच्या ( Mhada) मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे घरांचा सोडत काढण्यात येणार आहे. ही सोडत मुंबईतील विविध गृहनिर्माण योजनांतर्गत घरांसाठी काढण्यात येणार आहे. ( Mhada Lottery 2023 for Mumbai CM shinde will Inaugurate Program )

शरद पवारांबद्दल संभ्रम राहिल्यास फटका बसेल, मविआच्या बड्या नेत्याचं विधान

असा असणार कार्यक्रम…

आज सकाळी 11.30 वाजता मुंबईतील नरीमन पॉईंच येथील यशवंतराव चव्हाण सेंटरच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडणार आहे. या सदनिकांच्या विक्रीची सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काढण्यात येणार आहे. तसेच या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार देखील उपस्थित राहणार आहेत. 4083 घरांसाठी ही सोडत काढण्यात येणार आहे.

ते कसे गेले…; दीपक साळुंखे यांची शरद पवारांनी उडवली खिल्ली !

22 मे ला या 4083 घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. मुंबईतील अंधेरी, जुहू, गोरेगाव, कांदीवली, बोरिवली, विक्रोळी, घाटकोपर, पवई, ताडदेव सायन येथे उभारण्यात आलेल्या 4083 घरांसाठी ही सोडत काढण्यात येणार आहे. दरम्यान या अगोदर मुंबई मंडळाच्या सोडतीला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला होता. यानंतर आता देखील तब्बल एक लाख 20 हजार 144 अर्जांची संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे.

येथे पाहा सोडतीच थेट प्रक्षेपण…

हा सोडत कार्यक्रम व्यापक स्तरावर ठेवण्यात आला आहे. कारण तब्बल एक लाख 20 हजार 144 अर्जांची संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे. तसेच अर्जदारांना सोईस्कर रित्या पाहता यावा यासाठी मुंबईतील नरीमन पॉईंच येथील यशवंतराव चव्हाण सेंटरच्या सभागृहात एलईडी स्क्रिन्स लावण्यात येणार आहेत. तसेच https://www.youtube.com/live/UsZDZUL3YyA?feature=share या लिंकवर या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज