ते कसे गेले…; दीपक साळुंखे यांची शरद पवारांनी उडवली खिल्ली !

  • Written By: Published:
ते कसे गेले…; दीपक साळुंखे यांची शरद पवारांनी उडवली खिल्ली !

सोलापूरः माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे उपस्थित होते. त्यावेळी व्यासपीठावर अजित पवारांबरोबर गेलेले काही आमदार, माजी आमदार, पदाधिकारी उपस्थित होते. त्यावर पत्रकारांशी बोलताना शरद पवारांनी माजी आमदार दीपक साळुंखेसह इतरांची जोरदारपणे खिल्ली उडविली. हे सर्वजण खाली मान घालून निघून गेल्याचे पवार यांनी सांगितले. पण ते सांगताना त्यांनी कशी मान खाली घालून गेले याची अॅक्शनच करून दाखविली. त्यावेळी जोरदार हास्यकल्लोळही झाला.(Sharad Pawar mocked ex mla Deepak Salukhe)

सोलापूर जिल्ह्यात अनेक आमदार, माजी आमदारही अजित पवारांबरोबर गेले आहेत. माढ्याचे आमदार बबनराव शिंदे, त्यांचे बंधू अपक्ष आमदार संजय शिंदे, मोहोळचे आमदार यशवंत माने आणि सांगोल्याचे माजी आमदार दीपक साळुंखे हे अजित पवारांबरोबर गेले आहेत. त्यातील बबनराव शिंदे, माने व साळुंखे हे सांगोल्यातील कार्यक्रमाला हजर होते. हे तिघेही व्यासपीठावर बसले होते. ते पवारांना व्यासपीठावर भेटले होते.

परंतु पत्रकार परिषदेत शरद पवारांना त्यांची चांगलीच खिल्ली उडविली. मी त्यांना पाहिले. त्यानंतर ते खाली मान घालून निघून गेले, असे पवार म्हणाले. ते म्हणताना पवार यांनी मात्र ते कसे निघून गेले ती अॅक्शन करून दाखविली. पवारांनी एक नाही तर दोन वेळा ते कसे निघून गेले याची अॅक्शनच करून दाखविली. त्यामुळे तेथे उपस्थित असलेले सर्वजण व पवार जोराने हसले.

कोण आहेत दीपक साळुंखे ?
दीपक साळुंखे हे माजी आमदार आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष राहिलेले आहेत. तर सोलापूर जिल्ह्याचे आठ वर्ष जिल्हाध्यक्ष राहिले आहेत. ते अजित पवारांबरोबर गेले आहेत. त्यांची सख्खी बहिण जयमालाताई गायकवाड राष्ट्रवादी महिला प्रदेश उपाध्यक्ष, सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा राहिलेल्या आहेत. त्या मात्र शरद पवार यांच्या गटात आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube